हरदोई: पतीसोबत भांडण झाल्यानंतर महिलेने बाईकवरून उतरून थेट कालव्यात उडी घेतली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेही कालव्यात उडी घेतली. पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मधगंज पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. सध्या या दोघांचाही शोध सुरु आहे.

पण, आतापर्यंत या दोघांपैकी कोणाचीही माहिती मिळू शकलेली नाही. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी हे पती-पत्नी भावाच्या घरी गेल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये वाद झाला आणि घरी जात असताना पत्नीने थेट कालव्यात उडी घेतली. पत्नीने उडी घेतल्याचं पाहून तिला वाचवण्यासाठी पतीनेही कालव्यात उडी घेतली.

नोटांमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून शिवशाही चालकाच्या मृत्यूचं गूढ उकललं, धक्कादायक कारण पुढे
माधौगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नेवाडा गावात राहणारा मानसिंगचा मेहुणा बिलग्राम कोतवाली भागातील अख्त्यारपूर येथे राहतो. मानसिंग पत्नी आरतीसोबत लग्नात सहभागी होण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.

लग्नात नाचण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आरती तिच्या बहिणींसोबत लग्नात नाचत होती. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. दोघेही मधुगंज येथून घराकडे निघाले आणि शारदा कालव्याच्या पुलावर पोहोचले. यादरम्यान, दुचाकीचा वेग थोडा कमी झाला. तेव्हा आरतीने अचानक दुचाकीवरुन खाली उतरुन कालव्यात उडी घेतली.

नटून थटून नवरदेव आला अन् बोहल्यावर चढण्याअगोदरच जेलमध्ये गेला, प्रेयसीमुळे पोलखोल

दोघांचाही शोध सुरु, अद्याप काहीही सापडलेलं नाही

या प्रकरणाची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांसह नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. दोघांचा शोध सुरू आहे. मात्र, आतापर्यंत त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अतिरिक्त पोलिस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी सांगितले.

२ वर्षांची मैत्री, मग भरवस्तीत साक्षीचा खून; AC मॅकेनिक कसा बनला खुनी? साहिलची पूर्ण कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here