बीजिंग: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी चीनकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनमधील कंपन्यांनी विकसित केलेल्या दोन लशी या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यातील एका लशीला पेटंट देण्यात आले आहे. चीनमधील CanSino Biologics Incने आपल्या कोविड-१९ च्या लशीला पेटंट मंजूर करून घेतले आहे.

करोना लशीचे चीनचे हे पहिले पेटंट आहे. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेलीने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनच्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा प्रशासनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. CanSino Biologics Incच्या लशीला ११ ऑगस्ट रोजी पेटंट देण्यात आले. CanSino Biologics Inc ने विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सौदी अरेबियातही पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची तयारी आणखी काही देशांमध्ये सुरू असताना चीनमधील लष्करी जवानांना ही लस टोचण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले होते.

वाचा:

संपूर्ण जगाला करोनाला अटकाव करणाऱ्या लशीची प्रतिक्षा आहे. भारतही लशीबाबत इतर देशांच्या संपर्कात आहे. त्याशिवाय भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका आणि अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या लशीकडे भारताचे लक्ष आहे. ऑक्सफर्डची लस भारतात सिरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. त्याशिवाय या लशीची किंमतही कमी असणार आहे. त्यामुळे भारताचे लक्ष या लशीकडे अधिक लागले आहे. ऑक्सफर्ड व मॉडर्नाच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

वाचा:

दरम्यान, चीनची ही लस ‘अॅडनोव्हायरस टाइप-५’ वायरल वेक्टरपासून विकसित केली आहे. या लशीची निर्मिती CanSino Biologics आणि लष्कराने संयुक्तपणे केली आहे. या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत ६०३ स्वयंसेवकांचा समावेश होता. लस टोचल्यानंतर शरीरात २८ व्या दिवशी व्हायरसशी लढणारे अॅण्टीबॉडी आढळून आले. ही लस अद्याप करोनाबाधितांना देण्यात आली नाही. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर ही लस SARS-CoV-2 च्या विषाणूशी लढण्यास किती सक्षम आहे, हे समोर येणार. मानवी चाचणी दरम्यान ही लस टोचल्यानंतर त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. ही लस सुरक्षित असल्याचाही दावा करण्यात आला आहे. चीनच्या आणखी एका लशीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. या टप्प्यात १५ हजारजणांना लस देण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here