नगर: नगरमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या गुरुवारी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. शेतकरी नेते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्याचा इशाराचा संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे संघटनेने तसे निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले असल्याने आता प्रशासनासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. ( on Milk Rate Issue )

‘आमचा दुधाचा धंदा मोडकळीस निघणार असेल, व त्यामुळे आम्ही रस्त्यावर येणार असू तर आम्ही करोनाचा विचार करणार नाही. करोना होऊन मरण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर लढून मरू. पण आम्ही या आंदोलनातून आता माघार घेणार नाही,’ असे संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी या आंदोलनाबद्दल बोलताना सांगितले.

वाचा:

केंद्र सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरीत रद्द करावा, ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रती किलो ३० रुपये देण्यात यावे, दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावे, शेतकऱ्याच्या थेट खात्यावर पाच रुपये प्रतिलीटर अनुदान जमा करावे, यासह विविध मागण्यांसाठी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या गुरुवारी (२० ऑगस्ट ) मोर्चा काढण्याचे नियोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. दुपारी एक वाजता नगरच्या स्टेट बँक चौकातून हा मोर्चा निघणार असून यामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, हा मोर्चा काढताना लॉकडाऊनचे, कंटेनमेंट झोन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार नाहीत, असे संघटनेने स्पष्ट करतानाच तसे निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे करोना अनुषंगाने असणाऱ्या नियमांचे पालन न करता मोर्चा काढण्याचे संघटनेने जाहीर केल्याने जिल्हा प्रशासनासमोर आता नवीन पेच उभा राहिला आहे.

वाचा:

भाजपची भूमिका नाटकी

येत्या गुरुवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब मोरे यांनी दूध प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले, ‘भाजपची भूमिका नाटकी आहे. कारण दोन वर्षापूर्वी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी पुणतांबा येथे मोठा संप झाला होता. पण भाजपने रात्री तीन वाजता दरोडेखोरांसारखी मीटिंग लावली आणि तो संप मोडून काढण्याचे महापाप केले. त्यामध्ये होते. भाजपचे आजचे आंदोलन हे राजकीय द्वेषापोटी असून तो केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप करताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते, ते भाजपने सत्तेत असताना का मार्गी लावले नाहीत?, असा प्रश्नही मोरे यांनी उपस्थित केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here