मुंबई : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी आता ऑनलाइन मद्य विक्री करणार आहे. यापूर्वीच ऍमेझॉनने ऑनलाइन मद्य विक्रीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता या दोन कंपन्यांची मद्य विक्रीमध्येही तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्टकडून ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही सेवा सुरु करणार आहे. तशा प्रकारचे पत्र कंपनीने दोन्ही राज्य सरकारांना दिले आहे. या पत्रानुसार फ्लिपकार्टच्या ग्राहकांना हिपबार ऍपचा वापर करता येणार आहे. ज्यातून ग्राहक आपल्या आवडीचा मद्य ब्रँड खरेदी करू शकतात. त्यानंतर हिपबार त्यांच्या जवळच्या आउटलेटमधून मद्य घेऊन ग्राहकांना घरपोच देणार आहे.

हिपबारमध्ये डियाजिओ इंडियाची २६ टक्के हिस्सेदारी आहे. करोनाचा फैलाव वाढल्याने होम डिलिव्हरीला खूप मागणी आहे. केंद्र सरकारने देखील मद्य विक्रेत्यांना ऑनलाइन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. फूड डिलिव्हरी स्टार्टअप असलेल्या स्विगी आणि झोमॅटोकडून यापूर्वीच काही शहरांमध्ये सेवा सुरु केली आहे.

केंद्र सरकारने
कंपन्यांसाठी एक नवा नियम लागू केला आहे. यापुढे ऑनलाइन विक्री करणाऱ्या या कंपन्यांना सर्व उत्पादनांवर त्याच्या निर्मितीच्या ठिकाणाचा उल्लेख करावा लागेल. जर एखाद्या कंपनीने अशा पद्धतीचा उल्लेख केला नाही तर कारवाईला सामोरे जावे लागले. यासाठी सरकारने ग्राहक संरक्षण (इ-कॉमर्स) कायदा २०२०ची अधिसुचना जारी केली आहे. नव्या नियमानुसार भारतात किंवा विदेशात तयार झालेल्या वस्तू ज्यांची विक्री भारतात केली जाते किंवा भारतीय ग्राहकांना केली जाते त्यावर निर्मितीच्या ठिकाणाचा उल्लेख केला पाहिजे. हा नियम घाऊक विक्रेत्यांना लागू होणार आहे. इ-कॉमर्स कंपन्यांना विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व वस्तूंवर किमतीसह सर्व तपशील द्यावा लागले. इतक नव्हे तर वस्तूची एक्सपायरी डेटचा उल्लेख करावा लागले.

नव्या कायद्यानुसार इ-कॉमर्स कंपन्यांना विक्रेत्याचा पत्ता, त्याचा फोन नंबर आदी माहिती द्यावी लागणार आहे. त्याच बरोबर ग्राहकांनी संबंधित विक्रेत्याला दिलेले रेटिंग आदी माहिती वेबसाइटवर देणे बंधनकारक आहे.

ऑनलाईन मद्य विक्रीवर कंपन्यांना डोळा
देशातील मद्याची बाजारपेठ जवळपास २७.२ अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनसारख्या कंपन्यांची या बाजारपेठेवर नजर आहे. फ्लिपकार्टने मद्य घरपोच देण्यासाठी हिपबार या कंपनीसोबत करार केला आहे. डियाजिओची हिपबारमध्ये हिस्सेदारी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here