मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्ग (सिंगल लेन) येत्या गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मार्गाच्या कामाची पूर्ती होईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली असून, निदान हा सरकारी वायदा तरी पूर्णत्वास जाऊ दे रे गणराया… अशी प्रार्थना कोकणात नेमाने जाणारे मुंबईकर करू लागले आहेत.मे महिन्यातील अचाट वाहतूककोंडीच्या बातम्या… शिमग्याच्या काळातील तक्रारींचा पाढा… गणेशोत्सवासाठी निघालेल्यांपुढे उभी ठाकणारी विघ्ने… कोकणात नेमाने, भक्तिभावाने जाणाऱ्या मुंबईकरांसाठी या नित्याच्या बाबी. या संदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या की घोषणा करायच्या ही त्याबाबतची सरकारी परंपरा. याच परंपरेत बसेल अशी एक घोषणा राज्य सरकारच्या वतीने, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण यांची ही घोषणा स्वागतार्ह आहे. या मार्गाबाबत आजवर अनेक वायदे झाले, अगदी न्यायालयांकडूनही कानपिचक्या देऊन झाल्या. या पार्श्वभूमीवर आता तरी ही कालमर्यादा पाळली जावी, अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करीत आहेत.

Vande Bharat Express : कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: वंदे भारतला अखेर मुहूर्त मिळाला, असं असेल वेळापत्रक

या आहेत घोषणा…

इन्सुली आणि झाराप येथील पुलांसाठी ६८ कोटी रुपये मंजूर

जुन्या रस्त्यावरील व्हाईट टॉपींगसाठी ३८ कोटी मंजूर

आंबोली-रेडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव

बांबार्डे येथील भूसंपादनाचे काम लवकरच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here