मुंबई: राज्यातील सेवा तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी आज येथे केली. मंदिरे खुली करण्यासाठी सर्व साधुसंतांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मागणीला पाठिंबा दिलेला आहे ( on )

वाचा:

मुंबईत येथे वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या पेचप्रसंगांवर आपली मते परखडपणे मांडली. या पत्रकार परिषदेला तसेच एसटी महामंडळाच्या युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘एसटी महामंडळ व बेस्ट कर्मचाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली होती. बेस्ट शंभर टक्के चालू आहे. ही बातमी खोटी आहे. ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्या सर्व बस धावत आहेत. तर बेस्टच्या मालकीच्या केवळ १५ टक्के बस चालू आहेत. कंत्राटदाराच्या बस चालू असल्यामुळे बेस्टचा तोटा होत आहे. याचा खुलासा सरकारने केला पाहिजे.’

वाचा:

एसटी महामंडळ हे खासगीकरणाच्या मार्गावर आहे. याच बरोबर एसटी महामंडळामध्ये वाहक चालकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्याबाबत कामगारांना आम्ही काही सूचना केलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन कोणत्याही निर्णयाची वाट न पाहता बस रस्त्यावर आणल्या पाहिजेत, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही बंदी तात्काळ उठवून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी. आतातरी लोकांचे दळणवळण सुरू व्हायला हवे, असे आवाहन आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. दिल्लीत केवळ मेट्रोसेवा बंद आहेत, मात्र इतर सर्व वाहतूक सुरू आहे तर उत्तर प्रदेशमध्येही परिवहन सेवा सुरू आहेत मग या बाबतीत महाराष्ट्र मागासलेला का दाखवता?, असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला. राज्यात लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

वाचा:

मंदिरांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मी स्वतः अकोल्यातील मंदिरे खुले करून आलो आहे. आता त्या ठिकाणी कावडही निघाली आहे. त्यात करोनाचा एकही रुग्ण निघाला नाही. साधुसंतांची जी मागणी आहे ती सरकारने मान्य करायला हवी. पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत. मी देखील तुमच्या सोबत आंदोलनाला उतरणार, असा शब्द मी त्यांना दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here