राज्यातील करोना स्थितीचे आजचे आकडे हे चिंता वाढवणारे आहेत तर काही अंशी दिलासा देणारे आहेत. आज दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाख २८ हजार ५१९वर पोहोचली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.०९ टक्के इतका आहे.
राज्यात आज ८ हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील रुग्णसंख्या ६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. तर, आजपर्यंत ३२ लाख ०६ हजार २४८ चाचण्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वाचाः
आज दिवसभरात २२८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २० हजार २६५ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यातील विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ५५ हजार २६८ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ३७ हजार ५५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I like the valuable information you provide in your articles.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Thank you for publishing this awesome article.