चेन्नई: आयपीएल २०२३ चा रोमांच अजूनही सगळ्यांमध्ये कायम आहे. चेन्नई सुपर किंग्जने यंदाचे आयपीएल पटकावले आहे. जडेजाची शेवटच्या दोन चेंडूंवर बाऊंड्री आणि मग धोनीची विजयानंतरची प्रतिक्रिया अजूनही सगळ्यांच्या मनात कायम आहे. पाचव्यांदा चॅम्पियन बनल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापनाने आयपीएल ट्रॉफीचे विशेष पूजन केले. २९ मे रोजी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यानंतर ट्रॉफी चेन्नईला पोहोचली आणि त्यानंतर येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या पुजाऱ्यांनी तामिळ पद्धतीने ट्रॉफीची पूजा केली.आयपीएल जिंकल्यानंतर ट्रॉफी मंदिरात नेण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी सीएसके संघ व्यवस्थापनाच्या परंपरेचा हा भाग आहे. याआधीही फ्रँचायझीचे मालक एन. श्रीनिवासन यांनी मंदिरात जात भगवान तिरुपतीचे आभार मानले आहेत. मात्र, या काळात संघातील कोणतेही खेळाडू मंदिरात उपस्थित नव्हते.
सर जडेजा! मोहितच्या गोलंदाजीसाठी जडेजाचा आधीच प्लॅन तयार होता; सामन्यानंतर पाहा काय म्हणाला
आयपीएलच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयाचे वर्णन चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचे मालक एन. श्रीनिवासन यांनी ‘चमत्कार’ असे केले आहे. अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालीच असे काही घडू शकते, असे ते म्हणाले. फायनलच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीशी बोलून शानदार विजयासाठी त्याचे व त्याच्या संघाचे अभिनंदन केले. श्रीनिवासन यांनी धोनीला दिलेला संदेश खास मीडियाशी शेअर केला होता.
श्रीनिवासन धोनीला म्हणाले, “महान कर्णधार. तुम्ही चमत्कार केलात. हे फक्त तुम्हीच करू शकता. आम्हाला खेळाडू आणि संघाचा अभिमान आहे.” गेल्या काही दिवसांत झालेल्या बॅक टू बॅक सामन्यांनंतर धोनीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी संघासोबत चेन्नईला येण्याचे निमंत्रण दिले. श्रीनिवासन म्हणाले, ‘हा सीझन असा होता जिथे चाहत्यांनी दाखवून दिले की ते महेंद्रसिंग धोनीवर किती प्रेम करतात. आम्ही पण करतो.”

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here