म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बदली झालेल्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सोडत नसल्याने कंटाळलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाने पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपर पोलिस ठाण्यात घडली. बाळकृष्ण नाणेकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून तीन महिन्यांपूर्वीच त्यांची पुणे येथे बदली झाली होती. यावरून सोमवारी रात्री नाणेकर आणि घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय डहाके यांच्यासोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर सहायक निरीक्षकाने फिनाइल प्राशन केले.बाळकृष्ण नाणेकर हे सायबर कक्षात कार्यरत होते. तीन ते चार महिन्यांपूर्वी त्यांची मुंबईहून पुणे येथे बदली करण्यात आली होती. तेव्हापासून घाटकोपर पोलिस ठाण्यातील सेवेतून मुक्त करावे यासाठी ते प्रयत्नशील होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ चालढकलपणा केला जात होता. पुण्यामध्ये बदली झाल्यानंतर राहण्याची व्यवस्था, मुलांचे शाळा प्रवेश तसेच इतर सर्व तयारी करण्यासाठी लवकरात लवकर सेवामुक्त करावे, अशी त्यांची मागणी होती. यासाठी त्यांनी सोमवारी रात्री घाटकोपर पोलिस ठाण्यातच वरिष्ठ निरीक्षक संजय डहाके यांची भेट घेतली. वरिष्ठ निरीक्षकांनी त्यांना सेवामुक्त होण्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सांगितली. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली आणि केबिनबाहेर जाऊन नाणेकर यांनी पोलिस ठाण्यात ठेवलेले फिनाइल प्राशन केले. मी थोड्या वेळात आले, नवऱ्याला सांगितलं, लग्नमंडपातून गेली, सगळीकडे शोधाशोध, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाणेकर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. नाणेकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नालासोपाऱ्यातील एका विहिरीत मंगळवारी दुपारी एका व्यक्तीचे शीर सापडले. याप्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. नालासोपारा येथील गास टाकी पाडा गावातील विहीर स्वच्छ करण्याचे काम ग्रामस्थांतर्फे सुरू होते. तेव्हा एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत मानवी शीराचा सांगाडा ग्रामस्थांना सापडला. ग्रामस्थांनी तत्काळ नालासोपारा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हे शीर ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. वसईत याआधी भुईगाव समुद्रकिनारी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला होता. त्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात वसई पोलिसांना तब्ब्ल १३ महिन्यांनी यश आले होते. त्यामुळे आता केवळ शीर सापडल्याने उर्वरित मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान नालासोपारा पोलिसांपुढे आहे.
VIDEO : तृतीयपंथीयांचा राडा; अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न