नवी दिल्ली : सोन्या-चांदीचे दर आज जाहीर झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत सातत्याने चढ उतार सुरू आहेत. तर आजही खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात आजही घसरण झालीये. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मे २०२३ रोजी फ्युचर्स तसेच सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट नोंदवली आहे. अशाप्रकारे सोन्याचा प्रति तोळा भाव ६० हजार रुपयांच्या खाली आला असून चांदीही स्वस्त झाली आहे.

Dividend Stocks: गुंतवणुकदारांसाठी खुशखबर! ‘या’ ५ कंपन्यांनी जाहीर केला बंपर लाभांश; तपशील जाणून घ्या
सोने-चांदी आजचा भाव काय?
अमेरिकन डॉलर १० आठवड्यांच्या उच्चांकावर कायम राहिल्याने आज सोन्याचा दर घसरला. भारतातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम ६०,००० रुपयांच्या वर असल्या तरी बाजारात पुन्हा घसरणीचा कल दिसू लागला आहे. कमजोर जागतिक संकेतांमुळे सराफा बाजारात कमजोरी दिसून येत आहे. तर देशांतर्गत फ्युचर्स मार्केट म्हणजे MCX वर सोन्या-चांदीच्या किमतीत नरमाई आली आहे.

एमसीएक्सवर सोन्याची किंमत सुमारे आज ६० रुपयांनी स्वस्त होऊन प्रति १० ग्रॅम ५९,८८८ रुपये झाली आहे. तसेच चांदीही १३० रुपयांनी स्वस्त झाली आहे. MCX वर चांदीची किंमत ७०,९१३ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. सांस्कृतिक तसेच गुंतवणुकीचे मूल्य आणि लग्नसराई आणि सणांच्या काळात पारंपारिक भूमिका लक्षात घेत सोन्याला भारतात महत्त्वाचा भाग मानला जातो.

तुम्हालाही ७५ रुपयांचे नाणे हवंय?, कुठं मिळणार, किंमत आणि सर्व काही जाणून घ्या
जागतिक बाजारात सोने-चांदी
डॉलर आणि यील्डच्या मजबुतीमुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे. कॉमेक्सवर किंमत प्रति औंस $१९५७ वर व्यवहार करत आहे तर चांदीचा भावही प्रति औंस २३.२४ डॉलरवर स्थिरावला आहे. कॉमेक्सवर दरांमध्ये सपाट व्यवहाराचे आणखी एक कारण म्हणजे कर्ज मर्यादा वाढवण्याचा करार. यामुळे वरच्या स्तरावरून सोन्या-चांदीच्या दरात नरमाई दिसून येत आहे.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

सोन्या-चांदीच्या दरांचा अंदाज
आगामी काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन्ही धातूंवर तज्ञांचे खरेदीचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here