कोल्हापूर : हौसेला मोल नसतं ते खरंच आहे. सध्याच्या प्री-वेडिंग आणि आफ्टर वेडिंग शूटच्या जमान्यात आपलं लग्न कसं वेगळ्या पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. अशाच पद्धतीचा एक लग्नसोहळा कोल्हापुरात पार पडला. कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील राज माळी यांच्या अभियंता असलेल्या लाडक्या बहिणीचं मंगळवारी गोव्यातील व्यवसायिक शशिकांत गोसावी यांच्याशी धुमधडाक्यात विवाह पार पडला. त्यानंतर या नवविवाहित दाम्पत्याने लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरावर चक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत वंदन केलं आणि आशीर्वाद घेतले.इचलकरंजी येथील गोसावी समाजाचे नेते डॉ. आप्पासाहेब माळी यांचा मोठा जनसंपर्क होता. गेल्या महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या मुलाचा विवाह गोव्यातील मुलीशी ठरला होता, तर गोव्यातील मुलाचा विवाह इचलकरंजीतील मुलीशी ठरला होता. यासाठी खास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही उपस्थिती लावली होती. हा विवाह सोहळा हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे पार पडला.

पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा
गोसावी यांच्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने तो धुमधडाक्यात साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं होत यामुळे लग्न लक्षात राहावं आणि जोरात व्हावं यासाठी लग्नाच्या आधी शशिकांत – प्रियांका आणि नवनाथ – संजना या वधूवरांचं हेलिकॉप्टरमधून मंगल कार्यालयात आगमन करण्याचा ठरवण्यात आलं. पण नंतर अशआ एन्ट्रीऐवजी महालक्ष्मी, ज्योतिबावर पुष्पवृष्टी करावी असं सुचवलं आणि त्यानुसार प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली.

३५ वर्षांनंतर घरात मुलीचा जन्म, बापानं हत्तीवरुन मिरवणूक काढली; अख्ख्या पंचक्रोशीला साखर वाटली

दुपारच्या मुहूर्तावर दोन्ही जोडप्यांचं लग्न पार पडलं आणि यांनतर तीन वाजता दोन्ही वधू-वर हे अमर सूर्यवंशी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दुपारी ३ वाजता बसले आणि अंबाबाई मंदिराकडे रवाना झाले. वातावरण खराब असल्याने त्यांनी पाऊण तासातच प्रथम अंबाबाई मंदिर आणि नंतर ज्योतिबावर पुष्पवृष्टी केली. तसंच सहजीवनाचा प्रवास सुखकर व्हावा अशी मनोभावे प्रार्थना केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील या शहराला मिळाला नवा पासिंग क्रमांक; आता फक्त MH 09 नाही तर…
कोरोची येथील प्रियंका माळी यांचे बंधू राज यांनी बहिणीच्या विवाह सोहळ्यानंतर अंबाबाई आणि ज्योतिबावर हवेतून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी २३ मे रोजी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार करवीरचे प्रांताधिकारी, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी तसंच करवीर आणि पन्हाळा तहसीलदारांनाही यासंदर्भात कळवण्यात आलं होतं. उजळाईवाडी येथील भारतीय विमान प्राधिकरणच्या संचालकांनीही हिरवा कंदिल दाखवल्यानंतर या नवदांपत्याने विवाहबध्द होताच हेलिकॉप्टरमधून अंबाबाई आणि ज्योतिबावर पुष्पवृष्टी केली. पुष्पवृष्टी करण्यासाठी हेलिकॉप्टर प्रवासासाठी तब्बल सव्वा लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या लग्नाची कोल्हापुरात एकच चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here