जळगाव : आपले दैव बलवत्तर असेल तर आपण कोणत्याही संकटापासून अगदी सहज वाचू शकतो, याचे उत्तम उदाहरण जळगामधील एका गावात पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील वटार गावामधील एका घरात घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली. जी घरे खाक झाली, त्या घरातील चिमुकले तसेच सर्व कुटुंबीय गावात हळदीची पंगत असल्याने जेवण करण्यासाठी गेले होते. याच, दरम्यान ही घटना घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या आगीमुळे अवघ्या काही क्षणात घरं खाक होवून तीन कुटुंबांचा संसार उघड्यावर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वटार गावात रहिवासी कैलास भिका ठाकरे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. काही क्षणात सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या आगीत वटार गावातील धनसिंग खंडु कोळी, भिकुबाई सुभाष कोळी आणि पांडुरंग सुभाष कोळी यांच्या घरांना आग लागली. तीनही घरे आगीत भस्मसात झाली. या आगीत संबंधित घरांमधील ठिबक नळ्या, शेती साहित्यासह अवजार आदी घरातील धान्यासह सर्व साहित्य खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दीड महिन्याच्या बाळासाठी बिल्डिंगच्या पाइपवरुन चढून गेल्या,शिरपूरच्या आधुनिक हिरकणी तृप्तीताईंची गोष्ट

डंपरची धडक, आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या गाडीला अपघात!

वटार गावातील सिलेंडरच्या स्फोटामुळे तीन घरे आगीच्या लपेट्यात सापडल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. या गावानजीकचे सुटकार, वडगाव, अडावदकरांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळाल्यावर चोपडा नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे दोन बंब तर जळगाव येथून आलेल्या एका अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घरे खाक झाली होती.

IPLच्या विजेतेपदानंतर धोनीवर मुंबईत होणार उपचार; गुडघ्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट

घटनास्थळी चोपड्याचे नायब तहसिलदार सचिन बांबळे, अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा, अडावद महसुलचे व्हि.डि.पाटील, महेद्र पाटील, पंकज बाविस्कर आदींनी भेट देत घटनेचा पंचनामा केला. तसेच जि.प.चे माजी सदस्स शांताराम पाटील, राकेश पाटील, सचिन महाजन यांनी नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले. घटनेची माहिती मिळाल्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याशी संपर्क साधला आणि आगीत घरे खाक झालेल्या नुकसानग्रस्तांना शासकीय तरतुदीनुसार मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर नुकसाग्रस्तांना तातडीने मदत केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण,राष्ट्रवादी आक्रमक, इंडिक टेल्सवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here