डोंबिवली : परप्रांतीय मुजोर फेरीवाल्यांनी मंगळवारी रात्री एका मराठी माणसाला बेदम मारहाण केली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव नरेश चव्हाण असून तो एका महापालिकेचा कर्माचारी आहे. दरम्यान मारहाण करण्याऱ्या दोघा फेरीवाल्यांविरुध्द रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर अनेक वर्षापासून परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी सुरु आहे. साधारण महिन्याभरापूर्वी रुग्णवाहिका चालक गणेश माळी याला फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. यानंतर मनसेने आंदोलन करत स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवा अशी मागणी केली. केडीएमएसी प्रशासनाने महिनाभर स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त केला. मात्र आता कारवाई थंड झाली आणि फेरीवाले पुन्हा दिसून आले. यातच मंगळवारी रात्री पुन्हा मराठी अधिकाऱ्याला परप्रांतीय मुजोर फेरीवाल्यांनी मारहाण केल्याने डोंबिवलीतील वातावरण तापलं आहे.नेमकी घटना काय?डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात इंदिरा चौक, कामथ मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन सिनेमा गल्ली आपल्या मालकीची आहे, अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले या भागात दहशतीचा अवलंब करुन व्यवसाय करतात. अनेक वर्षापासून परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी सुरु आहे. नागरिकांनी फेरीवाल्यांना बाजूला बसण्यास सांगितले की फेरीवाले संघटितपणे कर्मचारी किंवा नागरिकाला घेरुन त्याच्याशी उद्धट वर्तन करत असल्याचे प्रकार वाढले आहे असून असाच प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे.डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील मधुबन टॉकीज जवळ रस्त्यात आरोपी जितलाल रामआश्रय वर्मा, (वय २३ वर्षे) आणि श्रीपाल रामआश्रय वर्मा (वय २५ वर्षे) यांनी गाडा लावला होता. भर रस्त्यात धंदा करत असल्याने फिर्यादी नरेश चव्हाण यांनी सामान थोडेसे बाजूला घेण्यास सांगितले. यानंतर फिर्यादी आणि आरोपी फेरीवाले यांच्या वाद झाला. वादाचा राग मनात धरून फिर्यादी चव्हाण यांना शिवीगाळ करुन, त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. चव्हाण यांच्या उजव्या खांद्यावर, नाकाला, छातीवर , पाठीवर लाकडी बांबुने फिर्यादींना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नरेश चव्हाण हे जखमी झाले आहेत. दरम्यान मारहाण करण्याऱ्या दोघा फेरीवाल्यांविरुध्द रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोन्ही आरोपीचा शोध सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here