दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमापेक्षा जास्त गर्दी होत असते, असा टोला लगावला होता. नृत्यांगना गौतमी पाटील यांना समर्थन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाचार घेत खेडचा आमदार दिलीप मोहिते हा एक वादग्रस्त विषय असून मोहितेंनी गौतमीची तुलना राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर करणे हे चुकीचे आहे. तसेच खेडचे आमदार हे अज्ञानी असून तो वेड्यांच्या नंदनवनामध्ये जगत असल्याचे देखील आढळराव पाटील म्हणाले आहेत. यामुळे आमदार आणि खासदार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पहायला मिळत आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमी पाटील हिला समर्थन दिले आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिच्यावरून राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
यावर गौतमी पाटील हिने यावर प्रतिक्रिया देणे टाळले असून प्रेक्षकांचे माझ्यावर असलेले प्रेम असल्याने माझ्या कार्यक्रमाला गर्दी होत असल्याचे ती म्हणाली आहे. मात्र, येणाऱ्या काळात नृत्यांगना गौतमी पाटील ही राजकारणात एन्ट्री करणार का, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. राजकीय व्यक्तींमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगला असून येणाऱ्या काळात गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा गौतमीच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते, अशी खोचक टीका खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली. तुम्ही एकनाथ शिंदेंची सभा बघता. त्यांच्या गर्दीची तुलना गौतमीच्या कार्यक्रमाशी करता, असं असलं तरीही आम्ही काही गौतमीची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत करू शकतो. पण आम्ही पवारांना मानणारे आहोत. तेव्हा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी आमदारांनी याचं भान ठेवावे, असा पलटवार शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केला.