भोपाळ: मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात आलेल्या पाहुण्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. ते घरातून निघायचं नाव घेत नसल्यानं तरुणानं गळफास लावून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तरुणाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे.

खरगोन जिल्ह्यातील मेला ग्राऊंड परिसरात राहणाऱ्या पंडित राजेंद्र योगीनं झाडावर चढून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक ते दोन तास नाट्य सुरू होतं. काहींनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तरीही योगी ऐकायला तयार नव्हता. त्यानं गळफास लावून घेतला. मात्र सुदैवानं पोलिसांनी त्याला खाली उतरवलं. त्याला रुग्णालयात दाखल केलं. तरीही योगी जीव देण्याची भाषा करत आहे.
खांद्यावर सरडा, हातात अजगर; पबमध्ये नेमकं काय सुरू होतं? Instaवरच्या शायनिंगनं सगळेच गोत्यात
पोलिसांनी योगीची चौकशी केली. कौटुंबिक वादातून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्यातून उघडकीस आलं. योगीच्या घरात दोन महिन्यांपूर्वी त्याचा साडू राहण्यास आला. पाहुणा म्हणून आलेल्या साडूनं योगीच्या घरात मुक्काम ठोकला. तो माघारी जाण्याचं नावच काढत नव्हता. त्यामुळे योगीनंच त्याला निघण्यास सांगितलं. त्यावर साडूनं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे वैतागलेल्या योगीनं आत्महत्येचा प्रयत्न केला.

तरुणानं झाडावर चढून गोंधळ घातल्याची माहिती मिळाल्यानं घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी तरुण कडुलिंबाच्या झाडावर चढून गळफास लावण्याचा प्रयत्न करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं ऐकलं नाही. अखेर चारचाकीवर चढून पोलिसांनी त्याला खाली उतरवलं आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, अशी माहिती पोलीस अधिकारी बी. एल. मंडलोई यांनी दिली.
हॉटेलमध्ये बरीच गडबड सुरुय! टिप मिळताच पोलिसांची धाड; रुम उघडल्या अन् पोरापोरांची लाईन लागली
मी अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी त्याची दखल केली नाही. त्यामुळेच शेवटचा मार्ग म्हणून मी गळफास घेण्याचा प्रयत्न केला, अशी व्यथा योगीनं मांडली. माझा साडू माझ्याच घरात राहतो. तो घरात ठाण मांडून बसला आहे. माझा साडू घरातून न गेल्यास मी आत्महत्या करेन, असा इशारा योगीनं दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here