जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन डीसी येथे असून ही जागतिक बँक अविकसित आणि विकसनशील देशांना निधी तसेच तांत्रिक सहाय्य आणि धोरणात्मक सल्ला देते, परंतु देशांना जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर किती व्याज द्यावे लागते, हे तुम्हाला माहिती आहे का? जागतिक बँक कर्ज कसे देते? जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेतलेले देश कोणते आहेत? आज आपण इथे जाणून घेणार आहोत.
जागतिक बँकेची स्थापन कधी झाली?
१९४४ मध्ये ब्रेटन वूड्स परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाचा हा महत्त्वाचा भाग असून जागतिक बँक, IMF आणि जागतिक व्यापार संघटना यांच्याशी जवळून काम करते. ही बँक विविध प्रकल्पांसाठी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना कर्ज आणि अनुदान देते. विशेषत: अविकसित देशांना विकासकामांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात जागतिक बँक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बँक ५ ते २० वर्षांच्या कालावधीसह विविध विकास प्रकल्पांसाठी कर्ज देते.
जागतिक बँकेच्या कर्जावरील व्याज?
जागतिक बँक देशांना वेगवेगळ्या व्याजदरांवर कर्ज देते. एका अहवालानुसार जागतिक बँक भारताला ३.१० टक्के दराने व्याज देते, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या कारंजांमध्ये बँकेचा व्याजदर वेगळा असू शकतो. जागतिक बँकेने जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय कर्ज सांख्यिकी २०२२ च्या अहवालानुसार आधीच गरिबीने ग्रासलेल्या देशांचे कर्ज २०२० मध्ये १२% वाढून ६५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून करोना संकटामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
भारताबद्दल बोलायचे तर देशावर ४२.५ लाख कोटी रुपयांचे विदेशी कर्ज आहे. म्हणजे प्रत्येक भारतीयावर ३०,७७६ रुपयाचे कर्ज कर्ज आहे. विशेष म्हणजे २०१० मध्ये हा भार २१.९ लाख कोटी रुपयांचा होता, मात्र गेल्या १० वर्षांत त्यात सातत्याने वाढ झाली असून आता ९६% च्या वाढीसह ते २०२० मध्ये ४२.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये ८४,२५४ कोटी रुपयांच्या व्याजाचाही समावेश आहे.