अहमदनगर : शहराच्या बाजारपेठेतील मोची गल्ली भागात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानात पोलिसांना तलवारी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या. या तलवारी दुकानात विकण्यासाठी ठेवल्या होत्या की अन्य उद्देशाने ठेवल्या होत्या याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणी मालक नंदकिशोर मोडालाल बायड (वय ५३) याला पोलिसांनी अटक केली आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

नटून थटून नवरदेव आला अन् बोहल्यावर चढण्याअगोदरच जेलमध्ये गेला, प्रेयसीमुळे पोलखोल

गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत विविध प्रकारची आंदोलने, वाद आणि कारवाया होत असल्याने पोलिसांची बाजारपेठेवर नजर आहे. अशातच मोची गल्लीतील महावीर स्टोअर्स या दुकानात बेकायेदशीररित्या तलवारीचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पंचासह दुकानात जाऊन तपासणी केली त्यावेळी तेथे काऊंटरच्या खालील भागात सहा तलवारी आढळून आल्या.

Sharad Pawar : नगरमध्ये विखेंना अस्मान दाखवण्यासाठी पवारांचं प्लॅनिंग; उमेदवारीसाठी लंकेंसह या नावांची चर्चा
या तलवारी पितळ धातूच्या आहेत. त्यावर “सिरोही की तलवार गँरटी ३० साल” असा मजकूर लिहिलेला आहे. पोलिसांनी दुकानमालक बायड यांच्याकडे या तलवारीसंबंधी चौकशी केली. मात्र, पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. या दुकानात महिलांसाठीची सौंदर्य प्रसाधने आणि भेटवस्तूंची विक्री केली जाते. अशा परिस्थितीत तेथे तलवारी कशा आल्या? याची चौकशी पोलिसांनी केली. मात्र, दुकानमालक बायड यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही त्यामुळे पोलिसांनी त्या तलवारी जप्त केल्या.

दुकान मालकाला भारतीय शस्त्र कायद्याचा भंग केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या तलवारी तेथे विक्री करण्यासाठी ठेवल्याचा संशय आहे. मात्र, त्या कुठून आणल्या, आतापर्यंत किती जणांना विकल्या, त्याचा वापर कशासाठी होत आहे? याचा तपास पोलिस करत आहेत. सध्याच्या संवेदनशील वातावरणात भर बाजारपेठेतील दुकानात तलवारी आढळून आल्याने पोलिस सतर्क झाले आहेत.

रोहित पवार इज माय लाइफ, गेम खेळणाऱ्यांना संपवून टाकू, राम शिंदेंसह कार्यकर्त्यांना धमकी
या प्रकरणी पोलिस अंमलदार अभय कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील फौजदार मनोज कचरे, पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, ए. पी. इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, अतूल काजळे, कैलास शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here