कोल्हापूर: दोन दिवसांपासून पावसाने झोडपण्यास सुरुवात केल्याने जिल्हा महापुराच्या विळख्यात सापडण्याची चिन्हे आहेत. नदीने इशारा पातळी ओलांडल्याने महापुराचा धोका अधिकच वाढला आहे. धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून शंभरावर बंधारे पाण्याखाली गेली आहेत. अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. ( District )

वाचा:

शनिवारपासून जिल्ह्यात धुवांधार पाऊस पडत आहे. रविवारी आणि सोमवारी तर पावसाने जराही विश्रांती घेतली नाही. राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांत अतिवृष्टी सुरू आहे. धरणक्षेत्रातही प्रचंड पाऊस पडत असल्याने सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. राधानगरी धरणाचे चार दरवाजे रविवारपासून उघडले आहेत. यामधून तब्बल बारा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिरण्यकेशी, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, पंचगंगा यासह जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा नदीने सायंकाळी ३९ फुटांची इशारा पातळी ओलांडली. पाणी ४३ फुटांवर पोहोचताच धोका वाढतो. नदीचे पाणी अनेक गावात घुसते. मंगळवारी ही नदी धोका पातळीवरून वाहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बारा दिवसापूर्वी पंचगंगेच्या पाण्याने धोका पातळी ओलांडली होती. पुन्हा त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

वाचा:

गतवर्षी जिल्ह्यात मोठा महापूर आला होता. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. यामुळे चिखली, आंबेवाडी या दोन गावातील बहुतेक सर्वच लोकांनी दिवसभरात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. त्यांच्या मदतीसाठी येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने शंभरावर बंधारे पाण्याखाली गेली आहेत. अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पावसाचा जोरही कायम असल्याने जिल्ह्याला महापुराचा धोका वाढण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे. आणखी दोन ते तीन दिवस दमदार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे महापुराची छाया गडद झाली आहे.

वाचा:

सकाळी आरोग्य राज्यमंत्री यांनी शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी केली. पुराचा धोका वाढू नये म्हणून अलमट्टीतून जादा पाणी सोडण्याची विनंती त्यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री सतीश जारकीहोळी यांना केली. त्यानुसार सध्या अलमट्टी धरणातून अडीच लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पाच युवक थोडक्यात बचावले
शेतातील इलेक्ट्रिक मोटार काढण्यासाठी गेलेले पाच युवक कृष्णा नदीतून वाहून जात होते. पण त्यांना वाचवण्यात यश आले. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे ही घटना घडली. प्लास्टिक बॅरेल वापरून तयार केलेल्या तराफा घेऊन हे युवक मोटार काढण्यासाठी गेले होते. पण पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने तराफा पुढे वाहून जात असताना त्यांनी आरडाओरड सुरू केली. दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना वाचवण्यात यश आले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here