पुणे (बारामती) : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. याचदरम्यान, बारमतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवण न सांगितल्याच्या कारणावरून कोयता आणि काठीने झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील होळ गावच्या हद्दीतील आठफाटा येथे ही घटना घडली.

याबाबत देवीदास महादेव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश पोपट कांबळे, सुधीर सर्जेराव जावळे, भाऊ नामदेव साळवे, शेखर आनंदा कांबळे (सर्व रा. होळ आठफाटा, कांबळेवस्ती ता.बारामती) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अहमदनगरचं नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
फिर्यादी होळ गावचे हद्दीत आठ फाटा, येथे यशवंत कांबळे यांच्या घराजवळ आले असता आरोपींना जेवण न सांगितल्याच्या कारणावरून वरील चौघांनी लोखंडी कोयत्याने मारहाण केली. हातातील काठीने फिर्यादीचे तोंडावर, पाठीवर, डाव्या हाताचे मनगटावर, दोन्ही पायावर मारून फिर्यादीस गंभीर जखमी करून शिवीगाळ तसेच दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, भाऊ नामदेव साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास महादेव कांबळे (रा.होळ, आठ फाटा) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना यातील आरोपी याने फिर्यादीच्या घरासमोर येऊन जुण्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून त्याच्या हातातील काठीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत.

Appeal to Farmers: कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here