कल्पेश गोरडे, ठाणे: मे महिन्यात सर्वत्र पाणी टंचाई भासू लागते. येत्या शुक्रवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा, कोलशेत तसेच किसन नगर, वागळे इस्टेट या भागांत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता लक्षात घेता पाटबंधारे विभागाने पाण्याच्या नियोजनाकरीता येत्या शुक्रवारी २ जूनला दुपारी १२ वाजल्यापासून ते शनिवार ३ जून दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

पुण्यात तीन महिन्याच्या बाळाने अंगठी गिळली, नाजूक जठर फाटण्याची भीती, अखेर…
तसेच पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे देखील आवाहन ठाणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.

‘स्वच्छ’ नाल्यांचा पाहणी दौरा रद्द करत पाण्याचा प्रश्न जाणून घेण्यासाठी मनसेचा दौरा

नेमके कोणत्या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद ?

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २. नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

डीजेचा आवाज कमी करा, विनंती करणाऱ्या पुण्यातील वृद्धालाच हाकललं, अपमानाच्या भावनेतून टोकाचं पाऊल
पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असे टीएमसीने सांगितले आहे. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here