ठाणे: अंबरनाथमध्ये एक बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी लावण्यात आलीये. या बोकडाच्या अंगावर ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असं लिहिण्यात आलं असून त्यामुळेच या बोकडाच्या मालकानं त्याची १ कोटी १२ लाख ७८६ रुपये इतकी किंमत ठेवलीय. बोकड विक्रीनंतर या पैशातून गावी मदरसा बांधण्याचं बोकड मालकाचं स्वप्न आहे.

Beed Crime: दुचाकीवर बोकड खरेदीसाठी आले,अपेक्षेपेक्षा जास्त पैसे दिले, सत्य समजलं तेव्हा शेतकऱ्याला धक्का बसला
अंबरनाथच्या तहसील कार्यालयामागील सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा परिवारासह राहतो. स्टेशन रोडवर कपड्यांचा स्टॉल लावणाऱ्या शकील याला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड आहे. त्याच्या घरी असलेल्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झालं. त्याने पिल्लाचं नाव शेरू असं ठेवलं. शेरूला लहानपणापासून अतिशय या प्रेमाने वाढवत शकीलने मोठं केलं. या बोकडाच्या मानेवर नैसर्गिकरित्या उर्दू भाषेत ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असे शब्द लिहिलेले आहेत असा या मालकाचा दावा आहे.

चाँद नजर आया! दैवत, चंद्यासाठी लागली लाखोंची बोली; अनोख्या बोकडांची जोरदार चर्चा
तसेच या बोकडाला फक्त दोन दात असून त्याचं वजन १०० किलो इतकं आहे. शकीलने कुर्बानीसाठी या बोकडाची किंमत १ कोटी १२ लाख ७८६ रुपये इतकी ठेवली आहे. हा बोकड रोज सकाळी आणि संध्याकाळी सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका, हरभरा असे पदार्थ खातो. या बोकडाला विकून आलेल्या पैशातून उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी मदरसा बांधण्याचं शकीलचं स्वप्न आहे.

शकील याने या आधीही त्याचा एक बकरा विक्रीसाठी ठेवला होता, ज्याची किंमत १२ लाखांपर्यंत होती. मात्र त्याने हा बोकड न विकता स्वतःच ईदला त्याची कुर्बानी दिली. आता त्याच्या सव्वा कोटींच्या ‘शेरू’ला कुणी विकत घेतं का? आणि शकीलचं मदरसा बांधण्याचं स्वप्न पूर्ण होतं का? हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here