भंडारा : उन्हाळा बघता सर्वत्र वातावरण उष्ण असून चारा आणि पाण्याची कमतरता खरंच जाणवू लागली आहे. त्यामुळे याचा फटका जंगलात तसेच आजूबाजूच्या परिसरात वावरणाऱ्या प्राण्यांना तसेच माकडांना देखील बसत आहे. त्यामुळे काही माकड आपला कळप सोडून शहरात मिळेल त्या ठिकाणी ठाण मांडतात आणि आपली तहान भागवतात. याचदरम्यान, असाच एक वयस्क माकड भंडारा शहर वासियासाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या एक महिन्यापासून हे वयस्क माकड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच बडा बाजार येथील सुरेश हॉटेलमध्ये न चुकता मंगळवारी आणि शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोहोचतं आणि आपल्या नेहमीच्या टेबलवर जाऊन बसतो. त्या टेबलवर अन्य कुणी बसला असला तरीही त्याला काहीच फरक पडत नाही. हा त्याचा नित्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून असून हॉटेल मालक देखील तो आल्यावर त्याला नाश्ता व पाणी देतात.

Akash-Shloka Ambani : अंबानी कुटुंबात परी अवतरली, श्लोका अंबानींनी दिला कन्येला जन्म, दुसऱ्यांदा बनले माता-पिता
या माकडाला कधी भजींची तर कधी समोसे आणि कचोरीची मेजवानी मिळते. आता तर हॉटेलमध्ये येणारे ग्राहक सुद्धा या माकडाचे मित्र झाले असून त्याला आपल्या जवळचा नाश्ता ऑफर करायला चुकत नाही. हॉटेलचे मालक बाबन पंचभाईंचे म्हणणे आहे की, त्यांच्या हॉटेलमध्ये हे माकड गेल्या एक महिन्यापासून येत आहे. पहिल्या दिवशी तो हॉटेलात आला तेव्हा ग्राहक घाबरले होते. परंतु तो येऊन शांत बसला असल्याने त्याला थोडा नाश्ता देऊन बघितले. त्यानी तो नाश्ता केला आणि पानी पिल्यावर मुकाट्याने निघून गेला. त्यानंतर दर मंगळवार आणि शनिवार ते माकड आता इथे येत. सध्या या माकडाची संपूर्ण पंटक्रोशीत चर्चा आहे.

दरम्यान, हा वयस्क माकड थेट हॉटेलात येऊन टेबलवर बसून आपल्या आवडत्या पदार्थावर ताव मारतो. हा त्याचा नित्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून असून हॉटेल मालक देखील तो आल्यावर त्याला नाश्ता आणि पाणी देतात. शिवाय हे माकड कुणालाही इजा न पोहचवता नाश्ता आणि पाणी पिल्यानंतर निघून जातं. विशेष म्हणजे, हे माकड मंगळवारी आणि शनिवारी फक्त ह्या दोन दिवशीच हॉटेलमध्ये येतं इतर दिवशी ते कुठे जातं? काय खातं? याबद्दल कुणालाच काही माहिती नाही. त्यामुळे ठराविक दिवशी येणाऱ्या या माकडाला बघण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येत असतात.

Video: भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन, सहा जणांचं कुटुंब निघालं, अर्ध्या रस्त्यात धावत्या कारने घेतला पेट, अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here