जळगाव : रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेन्टेंनन्स म्हणून रेल्वे कर्मचाऱ्याने तब्बल ३२ सेवा बजावली. मात्र याच रेल्वे कर्मचाऱ्याचा आज सेवानिवृत्तीच्या दिवशी रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास समोर आली आहे. सुरेश मोहन सोनवणे (वय-६०, रा. वाकीरोड, जामनेर) असे मयत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सुरेश सोनवणे यांचा ज्या ठिकाणी नियुक्ती होती, त्या ठिकाणी सेवानिवृत्तीबद्दल आज सत्कार झाला. त्यानंतर भुसावळ येथील मुख्य कार्यालयात असलेल्या सत्कार सोहळ्यासाठी रेल्वेने जाण्यासाठी ते निघाले पण काही अंतर कापल्यावर त्यांच्यावर काळाने झडप घातली.

जामनेर शहरातील वाकी रोड परिसरातील रहिवासी सुरेश मोहन सोनवणे हे रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स म्हणून नोकरीला होते. त्यांची सध्या पाचोरा येथे नियुक्ती होती. त्यांच्या वयाची ३१ मे रोजी साठ वर्षे पूर्ण झाल्याने आज त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता. आज ते सेवानिवृत्त झाले. नियुक्ती असलेल्या पाचोरा येथील कार्यालयात सेवानिवृत्तीबद्दल सुरेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी भुसावळ येथे सेवानिवृत्त झालेल्या इतरही कर्मचाऱ्यांसोबत सुरेश सोनवणे यांचाही सत्कार होणार होता. या सत्कारासाठी सुरेश सोनवणे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकावरुन काशी एक्स्प्रेसने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले.

मी थोड्या वेळात आले, नवऱ्याला सांगितलं, लग्नमंडपातून गेली, सगळीकडे शोधाशोध, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
सुरेश सोनवणे यांचा मृत्यू कशामुळे झाला? अद्याप स्पष्ट नाही

दरम्यान रेल्वेत बसल्यानंतर सुरेश सोनवणे यांच्यासोबत विपरीत घडलं. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबाजवळ त्यांचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलीस तसेच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सुरेश सोनवणे यांची प्राणज्योत मालवली होती.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे मुख्य कर्मचारी तथा कल्याण निरीक्षक शिवशंकर राऊत आणि रामेश्वर निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. रूग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान सुरेश सोनवणे यांचा मृत्यू नेमका रेल्वेतून पडून झाला की इतर कारणामुळे हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इंजिनिअर लेक सुट्टीसाठी गावी, वडिलांबरोबर बाईकवर निघाली पण रस्त्यातच काळाने गाठलं…
सेवानिवृत्तीचा आनंद अवघ्या काही तासांचा..

मयत रेल्वे कर्मचारी सुरेश सोनवणे यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. ज्या रेल्वेसाठी संपूर्ण सेवा बजावली, त्याच कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीच्या दिवशी रेल्वे अपघातातच दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here