लखनऊ: लग्नाची सारी तयारी झाली. नवरदेवासह वऱ्हाड दारात आलं. मोठ्या धुमधडाक्यात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पुढील विधी पार पडले. नरवदेवाने साऱ्यांच्या साक्षीने वधूच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर दोघांनाही सोफ्यावर बसवण्यात आलं. यादरम्यान इतर विधी होण्यापूर्वी पोहुणेमंडळी जेवणावर ताव मारत होती. मात्र, तेवढ्यात असं काही घडलं की संपूर्ण लग्नमंडपात एकच गोंधळ माजला. नवरदेवाच्या मोबाईलवर एक फोन आला आणि तो लग्न मोडून निघून गेला.

उत्तर प्रदेशातील एका गावात लग्न समारंभ सुरु होता. नवरदेव नववधूसह स्टेजवर बसलेले होते. तेवढ्यात गावातीलच एक तरुण नवरदेवाच्या व्हॉट्सअॅपवर काही फोटो पाठवतो. तसेच नवरदेवाच्या मोबाइलवर कॉल करून त्याला व्हॉट्सअॅप तपासण्यास सांगतो. नवरदेव लगेच व्हॉट्सअॅप चेक करतो. त्याच्या व्हॉट्सअॅपवर त्याच्या भावी पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचं त्याला दिसतं. यानंतर, नवरदेव आणि फोन करणार्‍या तरुणामध्ये फोनवर जोरदार भांडण होतं. त्यानंतर नवरदेव स्टेजवरून खाली उतरतो आणि सांगतो की हे लग्न होऊ शकत नाही.

Jalna News: गावकऱ्यांना शंका, पाहिलं तर अख्खा रस्ता हातात आला, जालन्यातील त्या रस्त्याची Inside Story
हे प्रकरण शोहर्ताड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकडी या गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिस आणि ग्रामस्थांसह नातेवाईक यांनी नवरदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. तसेच, या दरम्यान नवरदेवाच्या फोनवर व्हिडिओ आणि फोटो पाठवणाऱ्या तरुणालाही पकडण्यात येतं. लोकांनी त्यालाही समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो तरुण ऐकायला तयार नव्हता. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला आणि वधूला न घेताच वऱ्हाडी परतले.

नटून थटून नवरदेव आला अन् बोहल्यावर चढण्याअगोदरच जेलमध्ये गेला, प्रेयसीमुळे पोलखोल

पोलिसांनी लग्नात अडथळा आणणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन शोहरातगड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. वधूच्या वडिलांच्या तक्रारीवरून विवाहात अडथळा आणणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here