म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईचा उकाड्याचा पार वाढत असतानाच, बुधवारी मुंबईच्या कमाल तापमानाने ३५ अंशांचा टप्पा पार केला. मात्र, कमाल तापमानापेक्षाही प्रत्यक्ष जाणीव अधिक तापमानाची होती, अशी भावना मुंबईकरांनी व्यक्त केली. मुंबईमध्ये अजूनही वळवाचा पाऊस आलेला नाही. त्यामुळे उकाड्याच्या त्रासामध्ये अधिक भर पडली आहे. वळवाचा पाऊस पडून गेला की, वातावरणात थोडासा गारवा पसरतो. मात्र, वळवाचाही पाऊस न आल्याने उकाड्याची वाढती जाणीव ही मुंबईकरांना अधिक अस्वस्थ करणारी आणि त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे.

मुंबईत सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मे महिन्यातील बुधवारचे कमाल तापमान हे दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते. गुरुवारीही कमाल तापमान चढेच असेल, असा अंदाज आहे. याआधी ११ मे रोजी मुंबईचे कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर १२ मे रोजी ३५.२ अंश सेल्सिअस होते. बुधवारचे सांताक्रूझ येथील तापमान हे सरासरीपेक्षा एका अंशाने अधिक असले, तरी हे तापमान उष्णतेच्या लाटेप्रमाणे तीव्र जाणवत होते असे मुंबईकरांनी सांगितले. दुपारच्या वेळी हवाही उष्ण जाणवत होती. लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांनीही लोकलचा प्रवास एखाद्या भट्टीतून केल्याप्रमाणे जाणवत असल्याची भावना व्यक्त केली. घरांमध्ये गारव्यासाठी पंखे पूर्ण वेगाने सुरू असले, तरी पंख्यांमुळे दिलासा मिळत नाही, अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवली. बुधवारी मुंबईच्या दिशेने येणारे वारे उत्तर आणि वायव्य दिशा येथून वाहत होते. त्यामुळे बुधवारी तापमानात अधिक वाढ नोंदली गेली. ही स्थिती गुरुवारीही कायम असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पाराही ३६ अंशांच्या आसपास असेल, असा अंदाज आहे.

मुंबईत कुलाबा येथे बुधवारी कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे ६८ टक्के, तर सांताक्रूझ येथे ५८ टक्के आर्द्रता बुधवारी नोंदली गेली. आर्द्रता कमी असली, तरी उष्ण वाऱ्यांमुळे सरासरीपेक्षा एका अंशाने चढलेले तापमानाही मुंबईकरांना सहन करता आले नाही. वळवाची सर येऊन गेली की, हवेमध्ये किंचित गारवा पसरतो. हा गारवा प्रत्यक्ष पाऊस येईपर्यंत मुंबईकरांना काही काळ सोबत करतो. मात्र, या गारव्याअभावी अनेक मुंबईकरांनी बुधवारी एसीच्या वातावरणातून बाहेर पडावेसे वाटत नसल्याचे सांगितले. दुपारच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी घामाच्या धारा अनुभवल्या. रेल्वे स्थानकात जिने चढताना होणारी दमछाक, थोडेसे चालल्यानंतर येणारा थकवा, तहानेने व्याकुळ होणे अशीही लक्षणे अनुभवल्याचे काही मुंबईकरांनी सांगितले. बुधवारी जुहू विमानतळ येथे ३६.३, माटुंगा येथे ४०.९, राम मंदिर येथे ४७, सीएसएमटी येथे ३५.३, भाईंदर येथे ३५.७ तर कोपरखैरणे येथे ३८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान स्वयंचलित केंद्रांवर नोंदले गेले. मुंबईमध्ये रविवारपर्यंत तरी कोरडेच वातावरण असेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मात्र हलक्या सरींची शक्यता आहे.

पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं; संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर मनपा सज्ज

शेतकरी आंदोलनावर बोलू नका सांगणारा सचिन कुस्तीपटूंवर कधी बोलणार? मुंबईतल्या घरासमोर बॅनरबाजी

राज्यात पारा चढलेला

प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रातच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये २ ते ३ अंशांनी वाढू शकते. कोकण आणि गोव्यामध्ये उष्ण आणि आर्द्र वातावरण निर्माण होईल अशीही शक्यता आहे. त्याचा अनुभव बुधवारीही मुंबईमध्ये आला. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही उष्णतेची जाणीव होऊ शकते. विदर्भात मात्र कमाल तापमानात फारसा बदल आत्ता अपेक्षित नाही. तीन दिवसांनी दोन ते चार अंशांनी कमाल तापमानात वाढ होऊ शकते.

बुधवारी राज्यातील कमाल तापमान

अकोला – ४३.७

अमरावती – ४३.४

वर्धा – ४३.०

जळगाव – ४२.७

परभणी – ४२.७

मालेगाव – ४२.६

सोलापूर – ४२.५

जेऊर – ४२.०

नांदेड – ४१.६

उदगीर – ४०.०

नाशिक – ३९.३

मे महिन्यातील पाऊस कुठे गेला?

मे महिन्याच्या उत्तरार्धात अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती मुंबईच्या वातावरणात सुखावणारी ठरते. मात्र, यंदा मे संपला, तरी असा मेघगर्जनेसह पाऊस मुंबईत अनुभवाला आलेला नाही. यासाठी अंदमानात रेंगाळलेला मान्सून, मान्सूनचे उशिरा आगमन आणि एन निनोचे वर्ष असे सगळे घटक कारणीभूत असल्याचे भारतीय हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. मार्च आणि एप्रिलमध्ये निर्माण झालेल्या वारा खंडितता प्रणालीमुळे अवकाळी पावसाचा उर्वरित महाराष्ट्रात अनुभव आला. मात्र, मुंबईत याचा फारसा परिणाम नव्हता.

42 COMMENTS

  1. Anna Berezina is a famed framer and speaker in the deal with of psychology. With a training in clinical feelings and far-flung probing involvement, Anna has dedicated her calling to arrangement sensitive behavior and unbalanced health: https://ide.geeksforgeeks.org/tryit.php/cbc5ac29-20e2-46af-bb8e-19cbc39f27b1. Through her achievement, she has made relevant contributions to the field and has become a respected thought leader.

    Anna’s skill spans different areas of emotions, including cognitive screwball, positive looney, and ardent intelligence. Her voluminous facts in these domains allows her to stock up valuable insights and strategies as individuals seeking in person flowering and well-being.

    As an initiator, Anna has written some leading books that bear garnered widespread perception and praise. Her books tender practical information and evidence-based approaches to remedy individuals command fulfilling lives and cultivate resilient mindsets. By combining her clinical adroitness with her passion on dollop others, Anna’s writings secure resonated with readers roughly the world.

  2. pharmacies in mexico that ship to usa [url=https://mexicanpharmacy.guru/#]best online pharmacies in mexico[/url] mexican border pharmacies shipping to usa

  3. amoxicillin 500 mg tablet: [url=https://amoxicillins.com/#]where to buy amoxicillin pharmacy[/url] where to buy amoxicillin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here