नवी दिल्ली : जूनच्या पहिल्याच तारखेला नागरिकांना महागाईपासून दिलासा देणारी बातमी आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ही कपात व्यासायिक (कमर्शियल ) सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किमतीत ८३.५० रुपयांनी कपात करण्यात आली. यातून देशातील कोट्यवधी नागरिकांना तेल कंपन्यांनी महागाईपासून काहिसा दिलासा दिला आहे.तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ८३.५० रुपयांनी कमी केली आहे. या निर्णयानुसार नवीन दर आजपासून लागू होतील. पण घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कुठली कपात झालेली नाही.
किती आहे १९ किलो व्यासायिक सिलिंडरचा दर
किती आहे १९ किलो व्यासायिक सिलिंडरचा दर
राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीसी सिलिंडरच्या दरात कपात होऊन हे सिलिंडर आता १७७३ रुपयांना मिळेल. तर मुंबईत हे सिलिंडर १७२५ रुपयांना मिळेल. कोलकात्यात १८७५.५० रुपये आणि चेन्नईत १९३७ रुपयांना हे सिलिंडर मिळेल.
विमान कंपन्यांनाही दिलासा
सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच तारखेला विमान कंपन्यांना दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधन दरात कपात केली आहे. जेट फ्युलच्या दरात ६६३२.२५ रुपके /KL इतकी कपात केली आहे. यावेळी विमान कंपन्यांचा ट्रॅव्हल सिजन जोरात सुरू आहे. अशात इंधन दरात कपात झाल्याने त्यांना फायदा होणार आहे.