गोल्ड हॉलमार्किंग नियम
१ जूनपासून सोन्याच्या हॉलमार्किंगशी संबंधित नियमही लागू होणार आहेत. यामुळे सोन्याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होईल. नवीन नियमानुसार आता हॉलमार्कशिवाय सोने खरेदी करता येणार नाही.
ईपीएफओच्या नियमांमध्ये बदलणार
१ जूनपासून ईपीएफओचे नियमही बदलणार आहेत. तुम्हाला तुमचे पीएफ खाते आधारशी लिंक करावे लागेल. ३१ मे पर्यंत पीएफ खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची अंतिम मुदत होते, अशा स्थितीत जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
ITR फायलिंगसाठी नवीन वेबसाइट
७ जूनपासून प्राप्तिकराची नवीन वेबसाइट सुरू होणार आहे. म्हणजेच आयटीआर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांनी याची जाणीव ठेवायला हवी.
चेक पेमेंटची पद्धत बदलली
बँक ऑफ बडोदा चेकद्वारे पेमेंट करण्याचे नियम १ जूनपासून बदलत असून आता अधिक रकमेचा धनादेश आल्यास प्रथम बँकेला त्याची माहिती द्यावी लागणार आहे.
अल्पबचत योजनांचे दर
अल्पबचत योजनेच्या व्याज दरांबाबत सरकार जूनच्या अखेरीस निर्णय घेईल. सरकार दर तिमाहीत लहान बचत योजनांचे व्याजदर ठरवते.
गॅस सिलिंडरचे दर घटले
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा देत सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलोच्या सिलेंडरची किंमत ८३.५० रुपयांनी कमी झाली असून जेट इंधनाच्या किमतीतही घट झाली आहे.