वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जगभरातील अर्थव्यवस्थांना मंदीची भाती वाटत असताना, युरोपातील जर्मनीसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात असताना देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल दमदार होते आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या अखेरच्या चौथ्या (जानेवारी ते मार्च २०२३) तिमाहीतील जीडीपीने हे बुधवारी सिद्ध केले. या चौथ्या तिमाहीचा जीडीपी वाढत ६.१ टक्के नोंदवला गेला आहे. यामुळे २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षाचा जीडीपी देखील वाढून ७.२ टक्के झाला आहे. ही माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिली आहे.

RBI Annual Report: ६.५% GDP वाढीचा अंदाज, महागाईपासून दिलासा; आरबीआयने जारी केला वार्षिक अहवाल
आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये जीडीपी ९.१ टक्के नोंदवला गेला होता. मात्र याच वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर जीडीपी ४ टक्के झाला होता. २०२२-२३च्या जीडीपीच्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्था ३.३ लाख कोटी डॉलरवर गेल्याचे स्पष्ट झाले असून पुढील काही वर्षांतच अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर होईल, असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यात देशाचा जीडीपी ६.१ टक्के नोंदवला गेला असतानाच चीनचा जीडीपी याच काळात ४.५ टक्के नोंदवला गेला आहे.

WEF चे अध्यक्ष म्हणतात – भारतीय अर्थव्यवस्थेवर ‘स्नोबॉल इफेक्ट’! नोकरी आणि गुंतवणुकीवर काय होईल परिणाम?
जीडीपी हा वास्तविक (रिअल) आणि सामान्य (नॉमिनल) अशा दोन प्रकारे मोडला जातो. सामान्य जीडीपी हा सध्याच्या किंमतींनुसार मोजला जातो. २०२२-२३मध्ये नॉमिनल जीडीपी २७२.४१ लाख कोटी रुपये किंवा ३.३ लाख कोटी डॉलर होईल अशी अपेक्षा आहे. २०२१-२२मध्ये हा जीडीपी २३४.७१ लाख कोटी रुपये किंवा २.८ लाख कोटी डॉलर नोंदवला गेला होता. दोन्ही नॉमिनल जीडीपींची तुलना पाहता, मागील आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धीदर १६.१ टक्के राहिला.

US Debt: जागतिक महासत्ताही भारताचा कर्जदार, अमेरिकेच्या डिफॉल्टचा भारतावर परिणाम; किती थकबाकी? जाणून घ्या
आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (जीव्हीए) मार्च २०२३अखेर ७ टक्के झाली. जीव्हीए मागील आर्थिक वर्षात ८.८ टक्के होती. वस्तूनिर्मिती क्षेत्राची जीव्हीए मार्च २०२३मध्ये ४.५ टक्के (मागील वर्षात ०.६ टक्के), खनिकर्म क्षेत्राची जीव्हीए ४.३ टक्के (मागील वर्षात २.३ टक्के), बांधकाम क्षेत्राची जीव्हीए १०.४ टक्के (मागील वर्षात ४.९ टक्के) नोंदवली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here