कोल्हापूर : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. थरारक पाठलाग करत भर वस्तीत हल्ल्याची घटना घडल्याने शिवाजी पेठ परिसरासह शहरात खळबळ उडाली.फुलेवाडी परिसरात राहणाऱ्या प्रकाश बबन बोडके असं या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सध्या बोडके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बोडके याचा या परिसरातील एका तरुणांच्या गटाशी वाद सुरू होता. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवृत्ती चौकातील एका दुकानाजवळ प्रकाश बोडके थांबला होता. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या तिघा तरुणांनी अचानक प्रकाश बोडके याच्यावर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली. यानंतर प्रकाश बोडेके हा तिथून पळून जाऊ लागला. मग हल्लेखोरांनी प्रकाश बोडके याचा पाठलाग केला.

जखमी अवस्थेत बोडके हा दौलतराव भोसले शाळेच्या समोरील एका खासगी कार्यालयामध्ये जीव वाचवण्यासाठी शिरला. यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून बोडके याच्यावर सपासप वार केले. यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Crime News: कोल्हापूर पोलिसांना संशय, सापळा रचला; गाडी थांबवून उघडताच फुटला घाम
भरवस्तीत पाठलाग करून हल्ला

कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या शिवाजी पेठेत भर दिवसा पाठलाग करून तरुणावर हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन तरुणाचा पाठलाग केला. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भर दिवसा नागरी वस्तीत असा प्रकार घडल्याने याबाबतची चर्चा शहरात सुरू होती.

Kolhapur News: कोल्हापूरच्या रंकाळा तलावात मृत माशांचा खच, मासे कुजल्याने लागल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी
घटनास्थळी रक्ताचा सडा

हल्ल्यात तरुणावर तलवारीने सपासप वार करण्यात आले. सुमारे हल्ल्यात जखमी झालेल्या बोडके याने आठ ते दहा वार हातावर झेलले. तलवारीचे घाव वर्मी लागल्याने बोडके हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिघांनी तलवारीने वार केल्यानंतर जखमी झालेल्या अवस्थेतच बोडके याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनास्थळावर रक्ताचा सडा पसरला होता.

रंकाळा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात, संवर्धनासाठी मंजूर झालेले लाखो रुपये गेले कुठे?

भरवस्तीत घडलेल्या तलवार हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रथमदर्शनी तिघांनी हा हल्ला केल्याचं दिसून येत आहे. पोलीस योग्य तो तपास करत असून यासाठी परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घेतला जात आहे. लवकरच हल्लेखोरांना जेरबंद केले जाईल.
– सतीशकुमार गुरव, पोलीस निरीक्षक जुना राजवाडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here