म. टा. प्रतिनिधी, मुंबई

या हिंदी चित्रपटाला तिकीट दरावरील राज्य सेवा व वस्तू कराचा म्हणजेच एसजीएसटीचा परतावा देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अर्थ विभागाने बुधवारी घेतला. हे युद्ध मराठा पेशवे हरले, तरी त्यांनी युद्धामध्ये दाखविलेला पराक्रम इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. अशाप्रकारे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासावर आधारलेला चित्रपट राज्यातील सर्व जनतेने पाहणे आवश्यक आहे, असे कर परतावा देण्याच्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारने काही अटी-शर्तींवर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये पानिपत या हिंदी चित्रपटाच्या तिकिटाच्या रकमेवर आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या समतुल्य रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय अर्थ विभागाने घेतला आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहांना ही कर सवलत लागू असेल. एसजीएसटीचा परतावा देण्याचा निर्णय ३० एप्रिल २०२० पर्यंत लागू राहील, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयात नमूद आहे.

पानिपत हा हिंदी चित्रपट मराठा साम्राज्यातील तत्कालीन पेशवे व अहमद शहा अब्दाली यांच्यातील पानिपत येथील तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. १८व्या शतकात मराठा साम्राज्यशाही ही आपल्या सर्वोच्च शिखरावर होती. अशा परिस्थितीत पानिपत येथील तिसऱ्या युद्धात मराठा पेशव्यांतर्फे सदाशिवराव भाऊ यांनी या युद्धाचे नेतृत्व केले व अहमद शहा अब्दाली याच्याविरुद्ध अतुलनीय साहस व पराक्रम दाखविला, अशी माहिती या निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here