मुंबई: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एका महिला प्रवाशाचा हरवलेला महागडा फोन नाट्यमयरित्या सापडल्याची घटना समोर आली आहे. ही महिला सीएसएमटी स्थानकात उतरली तेव्हा तिला आपला मोबाईल फोन हरवल्याचे लक्षात आले. तिने त्याच ट्रेनमध्ये फर्स्टक्लासच्या डब्यात परत जाऊन पाहिले तेव्हा मोबाईल फोन तिकडे नव्हता. या मोबाईल फोनची किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी होती. साहजिकच इतका महागडा फोन हरवल्यानंतर ही महिला घाबरीघुबरी झाली आणि तिनेतातडीने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. या महिलेने २५ मे रोजी रेल्वे पोलिसांकडे मोबाईल फोन हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

२० लाखांच्या दागिन्यांची चोरी, चोराचा विमान प्रवास; मुंबईतील घटनेने पोलीस अवाक्

या महिलेने रेल्वे पोलिसांना तक्रार दिली तेव्हा आपला मोबाईल फोन कोणी चोरला की तो ट्रेनमध्ये राहिला, याविषयी तिला खात्री नव्हती. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी CSMT स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एक व्यक्ती लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात चढत असल्याचे दिसले. त्यानंतर हा व्यक्ती सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या व्यक्तीचा चेहरा ब्लर दिसत होता. त्यामुळे त्याची नेमकी ओळख पटवणे शक्य होत नव्हते. त्यावर रेल्वे पोलिसांनी एक युक्ती शोधून काढली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीच्या पायातील चपला आणि चालण्याच्या लकबीवर लक्ष केंद्रित केले. ज्या महिलेचा मोबाईल फोन हरवला होता ती सकाळी साडेअकरा वाजताच्या लोकल ट्रेनने सीएसएमटी स्थानकात उतरली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच पोलिसांनी या वेळेस येणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याच दिवशी दुपारच्या सुमारास फलाट क्रमांक १ आणि २ वर लक्ष ठेवत असताना रेल्वे पोलिसांना तशाच चपला घातलेला आणि चालण्याची विशिष्ट लकब असलेला व्यक्ती दिसला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी ट्रेनमधील मोबाईल फोन घेतल्याची कबुली दिली.

Pune Crime: तुळशीबागेत खरेदी करताना पर्सवर डल्ला, मुंबईकर महिलेची दोन लाखांची लूट

या व्यक्तीचे नाव हेमराज बन्सिवाल (वय ३०) असे आहे. हेमराजने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी एका ट्रेनमधून दुसऱ्या बाजूला जात होता. त्यावेळी महिलांच्या डब्यात एका सीटवर त्याला मोबाई फोन दिसला. इतका महागडा फोन पाहून हेमराजच्या मनात लालसा उत्पन्न झाली आणि त्याने फोन घेऊन पळ काढला. हेमराज बन्सिवाल हा कुर्ला येथे राहणारा असून तो टी-शर्ट विक्रेता आहे. त्याला घरभाडं भरण्यासाठी आणि धान्य भरण्यासाठी पैसे हवे होते. त्यामुळे आपण मोबाईल विकल्याचे हेमराजने पोलिसांना सांगितले.

तेलाचे डबे, साबुदाण्याची पोती; काजू-बदाम, साबण; लाखोंच्या मालावर डल्ला, चोरी करण्यासाठी थेट कार

अवघ्या ३५०० रुपयांना मोबाईल विकला

हेमराज बन्सिवाल याने चौहान नावाच्या व्यक्तीला फोन विकला होता. या दोघांनाही हा फोन कसा वापरायचा, हे माहिती नव्हते. हेमराजने तब्बल २ लाखांचा हा फोन हेमराजला अवघ्या ३५०० रुपयांमध्ये विकला. देविलाल चौहान हा पादत्राणांच्या दुरुस्तीचे काम करतो. हेमराज आणि देविलाल हे दोघेही राजस्थानमधील असून दोघेही कुर्ला येथे राहतात, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here