मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वारंवार चढउतार झाल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच सोन्या आणि चांदीच्या किमती घसरल्या होत्या, तर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीने घसरण कायम ठेवली आहे. अशा स्थितीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीची किंमत खाली घसरली आहे.

Rule Change June 1: नवीन महिन्यात नवीन बदल; सोन्याचे हॉलमार्किंग ते LPG गॅसची किंमत, आजपासून बदलले ‘हे’ नियम
सोने-चांदीचा आजचा भाव
गुरुवार, १ जून २०२३ रोजी देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे फ्युचर्स कालच्या बंदच्या तुलनेत ०.३% किंवा १७८ रुपयांनी ६०,०२० रुपये प्रति १० ग्रॅमवर लाल रंगात व्यवहार करत होते. तर आदल्या दिवशी सोन्याचे फ्युचर्स ६०,००० ते ६०,११५ रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत होते. दुसरीकडे, चांदीचा जुलै वायदा ०.३३% किंवा २३६ रुपयांनी घसरला असून खरेदीदारांना आज प्रति किलो ७१ हजार ८६६ रुपये मोजावे लागतील.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

दुसरीकडे, गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याच्या खरेदीसाठी प्रति १० ग्रॅमसाठी ग्राहकांना ५५,७०० रुपये मोजावे लागतील. तर प्रति किलो चांदीचा भाव ४००० रुपयांनी आपटला असून सध्या ७२,८०० रुपयांवर आला आहे.

Mutual Funds for Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड सही है? फायदे आणि तोटे समजून घ्या
भारतीय सराफा बाजारातील स्थिती
गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा दर ३१० रुपयांनी घसरला असून २४ कॅरेट सोन्याची नवीन किंमत ५९,७६० रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. तर चांदीच्या दरात ३४० रुपयांची घट झाली, त्यामुळे चांदीचा दर प्रति किलो ७१,७६० रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बुधवारीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर संध्याकाळी ०.५२% घसरणीसह ६०,०७० रुपयांवर तर चांदीचा भावही ०.४७% घसरून ७२,१०० रुपयांवर स्थिरावला होता.

नवीन कॉमेक्स दर
सध्या यूएस कॉमेक्सवर सोन्याचे भाव घसरले आहेत, तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. कॉमेक्सवरील सोन्याचा दर सुमारे १० वाजता $१.२० किंवा ०.०६% घसरून $१,९८०.९० प्रति औंस तर चांदीचा भाव $०.०३ किंवा ०.१२% वाढून २३.६२ प्रति औंस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here