नवी दिल्लीः फेसबुक प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कॉंग्रेस पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. या मुद्यावर कॉंग्रेस सतत केंद्र सरकारला घेरत आहे. एका छोट्या कवितेच्या माध्यमातून कॉंग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला केला. तर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही कवितांच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.

‘बस इतनी सी कहानी’ या शीर्षकाने संबित पात्रा यांनी कविता ट्विटवर पोस्ट केली. ‘घराणेशाही’चा तिलिस्म तुटला आणि जनतेचा संताप अनावर झाला, अशी टीका पात्रा यांनी केलीय. निराशेचा शेवटचा धक्का म्हणजे फेसबुकवरून हल्लाबोल, असं कवितेच्या शेवटी म्हणत गांधी घराण्याला लक्ष्य केलंय.

कॉंग्रेसनेही यापूर्वी ट्विट केलं होतं. ‘एक गोष्ट सांग फेसबुक, तुझ्या चेहऱ्याचं सत्य काय?’ असं म्हणत काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेसबुक प्रकरणावरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. ‘भाजप-आरएसए भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नियंत्रित करत आहेत. या माध्यमातून ते खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केलाय. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेतील वृत्तपत्राच्या वृत्तावरून राहुल गांधी यांनी हा आरोप केला होता.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने केंब्रीज अ‍ॅनालिटिकाच्या सहकार्याने फेसबुकच्या डेटाचा गैरवापर केला होता. ज्याची चौकशी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे ७०० कॉंग्रेस आणि डाव्या पक्षाची फेसबुक पेजे बंद करण्यात आली होती, असं उत्तर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी दिले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here