रत्नागिरी : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आता रत्नागिरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे टपाल खात्यातील एका कर्मचाऱ्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या २६० बचत खात्यांमधून ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. बुधवारी यासंबंधी माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन परसराम गुट्टे यांनी २०१८-२० पासून आंजर्ला उप पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी बनावट व्हाऊचर तयार केलं होतं. त्यामध्ये एकतर मयत किंवा नियमित लाभार्थी नसलेल्या लाभार्थ्यांच्या सह्या आणि अंगठ्याचे बनावट ठसे त्यांनी घेतले. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण गुट्टे याने संजय गांधी योजना, श्रवण बाल योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यांसारख्या सामाजिक कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या बचत खात्यामधील पैशांचा उधळपट्टी केली आहे.

Monsoon Update: मान्सूनची आगेकूच, पुढच्या २ दिवसांत अरबी समुद्रात बरसणार; हवामान खात्याचा अंदाज
खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सेंट्रल बँकिंग सॉफ्टवेअर ‘फिनॅकल’ वापरता येत नव्हता. त्यामुळे खात्यातून पैसे गायब करणे सहज शक्य झाले. तर नेटवर्कच्या समस्येमुळे प्रलंबित असलेलं काम पूर्ण करण्यासाठी तो कामाच्या वेळेनंतर दुसऱ्या कार्यालयात जायचा. तिथे त्याने सीबीआय फिनॅकलमधील बचत बँक खात्यांशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी पोस्टल असिस्टंट आणि सब-पोस्टमास्टरचा वापरकर्ता आयडी वापरला आणि सर्व काम स्वतःच केलं, असाही आरोपी एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

Shocking News: लग्न ठरलं पण वजन ९५ किलो होतं, वेट लॉस सर्जरीसाठी गेली अन् तासाभरात मृत्यू
दरम्यान, रत्नागिरी टपाल विभागाने दाखल केलेल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण मुख्य पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्तरांनी २७ जुलै २०२० रोजी यासंबंधी माहिती दिली आणि त्यानंतर फसवणूक झाली असल्याचं उघडकीस आलं. खातेदारांच्या खोट्या सह्या किंवा अंगठ्याचे ठसे बनवून सुमारे २६० खात्यांमधून ६० लाख रुपये त्यांनी काढून घेतले होते. अनेक दिवस खातेदारांकडून ही खाती चालवली जात नसल्याने आरोपी गजानन गुट्टे याने ही खाती टार्गेट केली. टपाल खात्याने गुट्टे यांच्या कारवायांची माहिती घेत त्यांना निलंबित केले आहे. त्यानंतर विभागाने त्याच्याविरुद्ध सीबीआयकडे तक्रार दाखल केली.

Crime Diary: प्रेयसीचा पती गावी येणार तोच प्रियकराचं प्लॅनिंग, युपीहून मुंबईत आला अन्…; कांदिवली व्यापाऱ्याच्या हत्येचं भयानक सत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here