ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला आशा आहे की, द ओव्हल मैदानावरील WTC फायनलसाठीचे पिच हे फलंदाजांसाठी अनुकूल असेल. पण त्याच बरोबर त्याला असे ही वाटते की, मॅच जश जशी पुढे जाईल तस तसे ऑस्ट्रेलियाला भारतातील परिस्थितीला सामोरे जावे लागले. ओव्हल पिचवर चेंडूला वेग आणि उसळी मिळते, तसेच येथील परिस्थिती फलंदाजांना अनुकूल मानली जाते. भारत अशा परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊ शकतो.
स्मिथच्या मते, ओव्हलवर विशेषत: मॅच पुढे जाईल तसे फिरकीपटूंनी मदत मिळेल. यामुळेच आम्हाला मॅचच्या काही टप्प्यावर भारतासारखी परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. याच बरोबर त्याने ओव्हलमधील आउटफिल्ड संदर्भात आपले मत व्यक्त केले. ओव्हलवर क्रिकेट खेळण्याचा अनुभव शानदार असतो. येथील आउटफिल्ड फार वेगवान आहे. फलंदाजीसाठी ही जागा सर्वात चांगली आहे. येथे इंग्लंडमधील अन्य पिच प्रमाणे वेग आणि उसळी देखील असते, असे स्मिथ म्हणाला.
फ्रेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाने भारतात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. त्यात ऑस्ट्रेलियाचा १-२ असा पराभव झाला होता. तेव्हा इंदूर कसोटीत स्मिथकडे संघाचे नेतृत्व दिले होते.
स्मिथच्या मते कसोटी क्रिकेटमध्ये WTC हा एक शानदार प्रयत्न आहे. आमच्यासाठी अव्वल स्थानी राहणे आणि भारताविरुद्ध खेळणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ओव्हल मैदानावर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतील. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय प्रेक्षक अधिक असतील, असे ही तो म्हणाला.