जळगाव : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत भरदिवसा दरोडा टाकून रोकड लांबविल्याची धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बँकेतील अंदाजे १५ लाखांहून रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार हत्यार होतं. या हत्यार दाखवत त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावलं. यावेळी चोरांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केले. यानंतर त्यांनी बँकेतील रोकड घेऊन फरार झाले. बाजरीचा कट्टा घेण्यासाठी शहरात गेला, घरी पोहोचण्यापूर्वी अनर्थ घडला, ४ मुलांचं पितृछत्र हरपलं
सजवलेल्या बग्गीतून पोलीस अधिकाऱ्याची मिरवणूक; सहकाऱ्याला खांद्यावर घेत वाजत-गाजत निरोप
अवघ्या काही मिनिटांमध्ये चोरट्यांनी लुटून पळाले. त्यांनी बँकेतील अंदाजे १५ लाखांहून अधिकची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी एसपी एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्यांसह भेट दिली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.