पिंपरी: महाविकास आघाडीकडून आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाने १८ जागांवर दावा ठोकल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीतून आता लोकसभेसाठी आणखी एका नेत्याने दावा ठोकल्याचे पहायला मिळत आहे. भोसरीचे पहिले आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी आता खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. कारण तसे बॅनर देखील भोसरी परिसरात लागले आहेत.

विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विलास लांडे देखील खासदारकीची लढवण्याची तयारी करतात की काय अशा चर्चांना आता उधाण आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच लोकसभेच्या जागेवरून वाद होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

स्टार प्रचारक यादीत नाव, पण तोंडही दाखवलं नाही, अमोल कोल्हेंच्या ‘वेगळ्याच प्लॅन’ची चर्चा

दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राष्ट्रवादीतच या जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीला उत् आला आहे. मात्र यामुळे राष्ट्रवादीचं अंतर्गत स्पर्धा सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पोस्टरमधून त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.

गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत; अमोल कोल्हेंच्या पोस्टने पुन्हा चर्चांना उधाण

शरद पवार यांनी नुकतेच लोकसभेसाठी दोन नेते त्यांच्या मनात असल्याचे सांगितले होते त्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे ही दोन नावे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, विलास लांडे यांनी या जागेवर दावा ठोकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं या जागेवरून राष्ट्रवादीत अंतर्गत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर नवे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही जागा कोणाला मिळणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

शिरुर मतदारसंघातला निकाल फिरवणारा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अमोल कोल्हेंनी ताकद लावलीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here