व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळतंय?
धावत्या स्कूटरवर लिप लॉक किस करणाऱ्या दोन तरुणांचा एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तिघे जण स्कूटरवर बसले आहेत. ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांपैकी मागचे दोघं एकमेकांचं चुंबन घेताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. मात्र हे तरुण नेमके कोण आहेत, याविषयी माहिती उपलब्ध झालेली नाही.
सात सेकंदाची व्हिडिओ क्लीप ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. स्कूटरच्या मागून धावणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ शूट केला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे.
या तिन्ही तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीची पावलं उचलली आहेत. भररस्त्यात स्कूटरवर एकमेकांचं चुंबन घेत अश्लील कृत्य करणाऱ्या दोघा तरुणांचा आणि त्यांच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आता पोलिस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे नेटिझन्सचं लक्ष लागून राहिलं आहे.
पाहा व्हिडिओ :
नेटिझन्सचा संताप
या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोणी कलियुग आल्याचं म्हणत आहे, तर कुणी ‘आता हेच पाहायचं राहिलं होतं’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी या तरुणांना काय शिक्षा सुनवावी, हेसुद्धा सुचवलं आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये रामपूर विकास प्राधिकरण असा बोर्ड लिहिल्याचं दिसत आहे. त्यामुळे या कृत्याशी संबंध जोडत अनेकांनी रामपुरात अखेर विकास झाला, असा टोलाही लगावला आहे. आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.