नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झालेल्या साक्षी मर्डर केसमध्ये आतापर्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी साहिल खान याला अटक केल्यानंतर त्यानेही आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलीस आता घटनेच्या खोलात तपास करत आहे. अशात आता साक्षी, साहिल, नीतू आणि प्रविण यांचे इन्स्टाग्राम चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे या हत्याकांडामध्ये नवीनच ट्विट्स आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल ते ६ मेपर्यंत हे चॅटिंग समोर आले असून यामध्ये ६ तारखेला साक्षीने इन्स्टाग्रामवर साहिलला ‘Hi’ असं लिहलं होतं. इतकंच नाहीतर १४ एप्रिलच्या रात्री २ वाजता प्रविणने साक्षीला रिप्लाय म्हणून ‘Hi’ असा मेसेज केला. ‘तुझ्याशी बोलायचं आहे’ असंही तिने यामध्ये लिहलं होतं. इतकंच नाहीतर साक्षीने या मेसेजचा स्क्रीनशॉट नीतूला पाठवल्याचीही माहिती समोर आली आहे.

Sakshi Murder Case: सिद्धू मुसेवाला, हुक्क्याचा चस्का ते हत्येपूर्वीचा नवा CCTV; या ५ मुद्द्यांनी साक्षी मर्डर केसला नवं वळण

तर दुसरीकडे नीतू आणि साक्षी यांच्यातील संभाषणही समोर आलं आहे. ६ तारखेला नीतूने ‘साक्षी, तू कुठे आहेस, माझ्याशी बोलणार नाहीस?’ असा मेसेज केला होता. यानंतर साक्षीने उत्तर दिलं, की ‘यार, आई-वडिलांनी मला घरात कोंडून ठेवलं आहे. ते फोनही देत नाही आहेत. मी काय करू, मी पळून जाईन’ असा रिप्लाय साक्षीने दिला आहे. हत्येनंतर समोर आलेल्या या चॅटिंगमधून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. साक्षी पळून जाण्याबाबत का बोलत होती? तसेच नीतू ‘तू कुठे आहेस साक्षी, माझ्याशी बोलणार नाहीस’ असं का म्हणाली? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी पोलिसांनी साहिल याला साक्षीला ज्या ठिकाणी मारले त्या ठिकाणी नेले होते. या प्रकरणात साहिल, प्रविण, अजय अशा तिघांचीही नावं समोर आली असून त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. अशात आता साहिल आणि साक्षी यांच्याबद्दलचे आणखी काही भयंकर मुद्दे पोलीस तपासात समोर आले आहेत.

Crime Diary: प्रेयसीचा पती गावी येणार तोच प्रियकराचं प्लॅनिंग, युपीहून मुंबईत आला अन्…; कांदिवली व्यापाऱ्याच्या हत्येचं भयानक सत्य

तू खूप आगाऊ आहे… साक्षीचा ऑडिओ मेसेज…

साक्षीने साहिलला एक ऑडिओ मेसेज पाठवल्याचीही माहिती आहे. ज्यामध्ये ती त्याला ‘तू खूप आगाऊ आहेस. आता कुठे गेली तुझी गुंडगिरी?’ असं म्हणत आहे. या ऑडिओमुळे साहिलला राग आला असावा, असाही पोलिसांचा संशय आहे. साहिलने १५ दिवसांआधीच हरिद्वार इथून हत्येसाठी चाकू आणला होता. त्यामुळे तो त्याने कुठे फेकला याचा पोलीस अद्यापही शोध घेत असल्याची माहिती आहे.

Crime Diary: साहिल, प्रविण अन् अजय; प्रेमाचं जाळं खूनापर्यंत गेलं; साक्षी मर्डर केसची स्टार्ट टू एण्ड कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here