ठाणे: लग्न हळदी समारंभातील मंडपातच दोन मेहुण्यांनी फायटर आणि लाकडी दांडक्याने भावजीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील धाकडे शहाड परिसरात घडली असून मंडपातच हल्ला झाल्याचे पाहून पाहुण्यांमध्ये एकच पळापळ झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर मेहुण्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वरातीचा नाच भोवला; नवरदेव नवरीविनाच परतला

नारायण पाटील, राजेश पाटील (दोघेही रा. वडवली, आंबवली) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर मेहुण्यांची नावे आहेत. तर गौतम एकनाथ भंडारी (वय ५२ रा. रा. वडवली, आंबवली) असे हल्यात जखमी झालेल्या भावजीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार गौतम भंडारी हे कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील वडवली, आंबवली गावात राहतात. ते जिम ट्रेनरचे काम करतात. तर, हल्लेखोर मेहुणेही वडवली, आंबवली गावातच राहतात. तक्रारदार गौतम यांची भाची सायली हिच्या लग्नाचा हळदी सभारंभ २८ मे रोजी रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिम भागातील धाकडे शहाड परिसरात होता. याच हळदी सभारंभाला तक्रारदार गौतम आणि त्यांचे दोन्ही मेहुणे गेले होते.

मध्यरात्री इच्छा राहिली अ’पुरी’, लग्न मंडपात तुंबळ हाणामारी; दगडफेकही झाली, कारण काय?
एकीकडे हळदीचा कार्यक्रम मंडपात सुरू होता. तर दुसरीकडे एका मंडपात जेवणाची पंगत बसली होती. त्याच सुमारास रात्री साडे आठ वाजता तक्रारदार गौतम हे जेवणाच्या मंडपात असतानाच, त्यांच्या हल्लेखोर मेहुण्यांनी येऊन अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यावेळी हल्लेखोर नारायण पाटील याने गौतम यांच्यावर फायटरने हल्ला केला. तर दुसरा हल्लेखोर राजेशने लाकडी दांडक्याने हल्ला करून त्यांना लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. जेवणाच्या मंडपात हल्ला झाल्याचे पाहून निमंत्रित पाहुण्यांमध्ये एकच पळापळ झाली.

Video: पापडावरून लग्नात झाला तुफान राडा; एकमेकांना टेबल, खुर्च्यांनी जोरदार मारहाण
दरम्यान, तक्रारदार गौतम यांना काही नातेवाईकांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गौतम यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी दोन्ही हल्लेखोर मेहुण्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. गवळी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here