नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर अशुद्ध पाण्याची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तुम्ही तिथल्या विक्रेत्यांकडून बाटलीबंद पाणी विकत घेत असाल तर काळजी घ्या. कारण काही लोक या ठिकाणी अशुद्ध पाणी विकतात. हा विक्रेता कचरा वेचणाऱ्याकडून खराब बाटल्या घेतो. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात अशुद्ध पाणी भरून त्याची विक्री केली जाते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा बाटल्यांमधून पाणी विकत घेत असाल तर काळजी घ्या.अशुद्ध पाणी विकणाऱ्याला नागपूर RPF ने अटक केली आहे. रेल्वे प्रवाशांना घाण पाणी विकून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आणले जात होते. इरफान अस्लम कुरेशी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
फेकलेल्या बाटल्यांमध्ये भरले जाते ड्रममधून पाणी
रेल्वे रुळालगतच्या परिसरात आरपीएफ गस्त घालत होते. आरपीएफला झुडपात एका ड्रममध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या सापडल्या. दरम्यान, याच परिसरात एक व्यक्ती जमिनीवर ड्रम फेकताना दिसला. त्याचा पाठलाग करून अटक करण्यात आली. आरपीएफने या परिसराची पाहणी केली. नंतर रिकाम्या बाटल्या आणि सीलबंद बाटल्यांची झाकणं सापडली. यामध्ये आरोपी कचरा विक्रेत्याकडून बाटल्या खरेदी करून त्यात तो घाण पाणी भरून आणि बनावट लेबल लावून १५ ते २० रुपयांना विकतो, अशी माहिती मिळाली. यात आरपीएफ ने एका आरोपी ला ताब्यात घेऊन आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू असून पुढील तपास करत आहे.

प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी पाणी घेऊन निघावे लागणार आहे. कारण बाहेर मिळणारे पाणी शुद्ध असेलच याची शाश्वती नसते. एक मोठी टोळी बनावट पाण्याची बाटली बनावट लेबल लावून विक्री करत आहे.