श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील बारामुला जिल्ह्यात करेरी येथे लश्कर ए तोयबाचा कमांडर सज्जाद हैदर याला ठार करण्यातर सुरक्षा दलांना यश आलं आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून तो सक्रिय होता. सज्जाद हैदर ठार झाल्याने भारतीय सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. सज्जाद हैदर २०१६ मध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याने प्रथम हिजबुल कमांडर रियाझ नायकू यांच्या धर्तीवर काम करण्यास सुरवात केली. आता तो बुरहान वानीच्या धर्तीवर काम करत होता. त्याच्याबरोबर ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक स्थानिक आणि दुसरा पाकिस्तानी दहशतवादी आहे.

सज्जाद हा तरुणांना दहशतवादाच्या मार्गावर आणण्यासाठी काम करत होता. बुरहानसारखे व्हिडिओ बनवायचा आणि तरुणांना या मार्गावर आणण्याचे काम करायचा. सज्जादने दहशतवादाच्या मार्गावर आणलेल्या २० तरुणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. याशिवाय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांसाठी काम करण्यासाठी सज्जादनेच त्यांचं मन वळवलं होतं. काश्मीरमधील १० टॉप कमांडरपैकी सज्जाद एक होता.

अनेक व्यापाऱ्यांच्या हत्या

.सज्जादने काश्मीरमध्ये चार वर्षांत अनेक फळ व्यापाऱ्यांच्या हत्या केल्या. सज्जाद त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. त्यांनी नकार दिल्यास सज्जाद त्यांची हत्या करत होता. याशिवाय इतर राज्यातील मजूर आणि स्थानिक नागरिकांच्या हत्यांमध्ये तो सामील होता. रियाझसारखे नागरिकांचे व्हिडिओ बनवून धमकावत होता.

हल्ला करून हिसकावली एके-४७

दहशतवादी सज्जादने अनेकदा सुरक्षा दलांवर हल्ले केले आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली एके-47 रायफलही त्याने सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करून पळवून नेली होती. सुरक्षा दलांच्या टार्गेटवर सज्जाद बऱ्याच कालावधीपासून होता. त्याचा शोध घेण्यात येत होता. सज्जादसोबत ठार झालेला अनयतुल्लाह हा स्थानिक तरुण होता. मार्चमध्ये तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. हल्ला करण्यासाठी त्याला तयार करण्यात येत होतं. यामुळे सज्जादने त्याला आपल्यासोबत ठेवलं होतं. तिसरा ठार दहशतवादी उस्मान हा पाकिस्तानी होता. तो नेहमी त्याच्याबरोबर होता. हे दोघे उत्तर काश्मीरमध्ये सक्रिय होते. हल्लांचा कट रचायचे आणि त्यानुसार ते काम करायचे.

नागरिकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा

उत्तर काश्मीरमध्ये सज्जादने मोठे जाळे पसरवले होते. कुठला ना कुठला व्हिडिओ बनवून तो उत्तर काश्मीरमध्ये नागरिकांपर्यत पोहोचत होता. त्याने नागरिकांमध्ये आपली दहशत निर्माण केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here