जळगाव : काम आटोपून घराकडे परतणाऱ्या एका बांधकाम कामागाराचा रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेनं मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी समोर आली आहे. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड जि.धुळे ह.मु. हनुमान नगर, जळगाव) असं मयत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील वाघ नगर परिसरातील हनुमान नगरात राजू पवार हे आपल्या पत्नी आणि मुलासह वास्तव्याला होते. ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथे काम आटोपून ते घरी येण्यासाठी निघाले होते. शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक (४१५-२५ ते २७) च्या दरम्यान रेल्वे रूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
एकुलता एक मुलाचे पितृछत्र हरपले

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. आज गुरूवारी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात मयत राजू पवार यांच्या कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मयत राजू पवार यांच्या पश्चात पत्नी मिनाबाई, मुलगा सुनिल, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. राजू पवार यांच्या मृत्यूने त्यांचा एकुलता एक मुलाचे पितृछत्र हरपले असून घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस नाईक हर्षल पाटील करत आहेत.

विलास लांडेंचे भावी खासदार म्हणून शिरुरमध्ये फ्लेक्स, अमोल कोल्हे यांची ‘पॉवर’फुल प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here