डेहराडून : उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील काशीपूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला झालेला कर्करोग आणि त्यावरील उपचारात सर्व संपत्ती घालवल्यानंतर एका दाम्पत्याने जीवनाची लढाई हरून अखेर मृत्यूला कवटाळले. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी डॉ. इंद्रेश शर्मा हे आपल्या मुलासोबत लुडो खेळले आणि त्यात विजय मिळवला, पण आयुष्याशी हार पत्करून त्यांनी मृत्यूला कवटाळले.

डॉ. इंद्रेश शर्मा, उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एका खाजगी रुग्णालयात आपत्कालीन डॉक्टर म्हणून तैनात असलेले सर्जन. त्यांची पत्नी वर्षा शर्मा यांचा कर्करोग झाला होता. ७ ते ८ वर्षे उपचार सुरू होते. यात त्यांची सर्व संपत्ती गेली. या परिस्थितीला कंटाळून शेवटी या डॉक्टरने पत्नीसह स्वत:ला विषारी इंजेक्शन मारून मृत्युला कवटाळले. ही हृदय हेलावणारी कहाणी या दाम्पत्याच्या मुलाने सांगितली. डॉक्टरांच्या अपयशाची ही हृदयद्रावक वेदना ज्या कोणी ऐकली, तो गलबलून गेला.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
कॅन्सरच्या महागड्या उपचारांनी कंबरडे मोडले

मयत डॉ. इंद्रेश शर्मा हे यांचे पत्नी वर्षा शर्मा यांच्यावरील महागड्या उपचाराने कंबरडे मोडले होते. त्या ६ ते ७ वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. यानंतर लॉकडाऊनमुळे त्याची परिस्थिती इतकी खालावली की त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षणही बंद केले.

मृत डॉक्टरांचा हयात असलेला मुलगा इशानच्या म्हणण्यानुसार, वडील इंद्रेश यांची इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावे आणि त्यांनी त्याला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली.

अचानक ब्रेक फेल झाले, भरधाव रिक्षा २० फूट खोल खड्ड्यात पडली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ४ गंभीर
बाबांसोबत लुडो खेळला

इशानच्या म्हणण्यानुसार, वडील त्या संध्याकाळी हॉस्पिटलमधून घरी आले आणि नेहमीप्रमाणे आराम केल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर इशान वडिलांसोबत लुडो खेळला. त्यात त्याचे वडील जिंकले, पण जीवनाच्या खेळात मात्र ते हरले.

इशान म्हणतो की, पप्पांनी त्याला सांगितले की हे एक इंजेक्शन आहे आणि आज सर्वांना ते लावायचे आहे. त्याचा वडिलांवर पूर्ण विश्वास होता. वडिलांना स्वत:ला पहिले इंजेक्शन देण्यास सांगितल्यानंतर डॉ.शर्मा यांचे डोळे भरून आले होते, पण इशानचा नेहमीच हिरो राहिलेल्या वडिलांनी जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या मुलाची ही इच्छा पूर्ण केली. यावेळी पहिल्यांदाच त्याने आपल्या लाडक्या मुलाला फसवले.

भंगारवाल्यांकडून बाटल्या विकत घेऊन अशुद्ध पाणी भरून विक्री, नागपूर स्टेशनवरील संतापजनक प्रकार
स्वतःला आणि पत्नीला विष टोचले

ईशान सांगतो की वडिलांनी स्वत:ला आणि आईला विषारी इंजेक्शन दिले. मला मात्र त्यांनी नॉर्मल इंजेक्शन देऊन या जगातून ते निघून गेले. डॉ. इंद्रेश शर्मा यांचे कुटुंब गेल्या १२ वर्षात वर्षा शर्मा यांच्या कर्करोगाशी लढताना आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या खूपच तुटून पडले होते, पण कुटुंबामध्ये जबरदस्त प्रेम होते. ते स्वत: वर्षा यांच्यावर उपचार करत होते. संपूर्ण कुटुंबाचे एकमेकांवर इतके प्रेम होते की मृत्यूही त्यांना वेगळे करण्याचा विचार करू शकत नव्हता.

घरातील वातावरण सामान्य होते. यामुळेच वास्तवाची जाणीवही कुणाला करता आली नाही. डॉ. शर्मा यांनी मुलाला इंजेक्शन दिले. काही वेळाने ईशान झोपी गेला. यानंतर तो सकाळी उठला. ईशानच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याने सर्वप्रथम त्याच्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती उठली नाही. तेव्हा त्याने तिची नाडी तपासली, पल्स मशीन सरळ रेषा दाखवत होती आणि ती श्वासही घेत नव्हती. त्यानंतर त्यांनी वडिलांना तपासले असता त्यांचे डोळे उघडे होते. तसेच ते देखील श्वास घेत नव्हते. यानंतर त्यांनी नातेवाईक व शेजाऱ्यांना फोन करून माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here