चेन्नई: तटरक्षक दल, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि सीमाशुल्क विभागाला तामिळनाडूमध्ये मोठे यश मिळाले आहे. पथकांच्या संयुक्त कारवाईत समुद्रात फेकलेल्या ११ किलो सोन्यासह एकूण ३२ किलो सोन्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. त्यानुसार सुमारे २० कोटी २० लाख रुपयांच्या सोन्याची भारतातून श्रीलंकेत तस्करी होत होती.

श्रीलंका आणि भारतादरम्यान ड्रग्जच्या तस्करीबाबत डीआरआयने दिलेल्या विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यानंतर ३० मे रोजी भारतीय तटरक्षक दल आणि डीआरआयने संयुक्त कारवाई सुरू केली. या कारवाईला मोठे यश मिळाले आहे.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक
या कामगिरीबाबत मिळालेल्या माहितीनुसार , भारतीय तटरक्षक दलाने डीआरआय आणि कस्टम्ससह सुरू केलेल्या ऑपरेशनमध्ये, तामिळनाडूमधील मन्नारच्या खाडीतील दोन मासेमारी नौकांमधून ३२ किलो ६८९ ग्राम सोने जप्त केले. हे सोने श्रीलंकेतून भारतात आणले जात होते.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव
तटरक्षक दल आणि DRI द्वारे तैनात केलेल्या संयुक्त पथकांनी मन्नारच्या आखातात विशेषतः भारत-श्रीलंका आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर (IMBL) मासेमारी करणाऱ्या जहाजांवर कडक नजर ठेवली होती.

अचानक ब्रेक फेल झाले, भरधाव रिक्षा २० फूट खोल खड्ड्यात पडली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ४ गंभीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here