‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization – WHO) म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या WHO वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळंच करोना वाढलाय,’ असं वक्तव्य राऊत यांनी एका वृत्तवाहिनीतील कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून गदारोळ उठला होता. भाजपनं राऊत यांच्याकडून माफीची मागणी केली होती. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’नं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. ‘डॉक्टरांना खरंच काही कळत नाही असं तुम्हालाही वाटतं का, अशी विचारणा ‘मार्ड’नं मुख्यमंत्र्यांना केली होती. तसं वाटत नसेल तर राऊतांना माफी मागायला लावा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही देण्यात आला होता.
डॉक्टरांच्या या पवित्र्यानंतर राऊत यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासा केला होता. ‘बोलण्याच्या ओघात काही शब्द तुटकपणे येतात. मी जागतिक आरोग्य संघटनेबद्दल बोलत होतो. डॉक्टरांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आव्हाड यांनीही ट्वीट करत संजय राऊत यांची पाठराखण केली आहे.
‘जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासार्हतेबद्दल अमेरिकेनेही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांच्याशी संबंधही तोडून टाकले आहेत. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंकाकुशंका व्यक्त केल्या. ह्या विषयावर कोणीही बोलताना दिसलेले नाही. संजय राऊत बोलले आणि जणू वादळच आले,’ असा टोला आव्हाड यांनी हाणला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
These are actually great ideas in concerning blogging.
A big thank you for your article.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.