बीड: बीडमधील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येत कारखान्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बिनविरोध २१ संचालक निवडले आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजीमंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहीण-भाऊ एकत्र आले. यामुळे २१ सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले.

कारखान्याच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी नऊ मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक पदाच्या २१ जागांसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ५० पैकी १३ अर्ज नामंजूर झाले होते तर ३७ अर्ज मंजूर झाले. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह १६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे २१ जणांचे अर्ज शिल्लक राहिले. यामुळे २१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये बहुतांश उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गटाचे आहेत.
Mumbai Traffic : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून सुटका: थेट ३ किमीच्या बोगद्याचे काम सुरू, असा असेल मार्ग

बिनविरोध निवडून आलेले २१ उमेदवार:

पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मिक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड ,चंद्रकेतू कराड ,शिवाजीराव गुट्टे ,शिवाजी मोरे ,सुधाकर सिनगारे ,सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे
Sharad Pawar : पवार आधी शिंदेंना अन् नंतर अदानींना भेटले; काय चर्चा झाली? बहुचर्चित भेटीची इनसाइड स्टोरी
बहीण भावाच्या या दिलजमाई नंतर आता बीडच्या राजकारणात पुढील समीकरण कसं असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा सध्या होत असताना पाहायला मिळते. मात्र, बहुचर्चित असलेल्या वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीतील बहुतांश विजयी उमेदवार हे पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याने पुन्हा एकदा वैद्यनाथ कारखान्यावर पंकजा मुंडे यांचा वर्चस्व राहणारच असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Mumbai Goa Highway: या कारणामुळे पावसाळ्यात परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळू शकते; मंत्र्यांकडूनच धोक्याचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here