मुंबई: वांद्रे परिसरातील बँडस्टँड परिसरात एका २८ वर्षीय मुलीला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत बँडस्टँडवर आली होती. याठिकाणी रात्रीच्या अंधारात प्रियकराने तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने नकार देताच आक्रमक झालेल्या प्रियकराने तिला बेदम मारहाण केली. यामध्ये संबंधित मुलीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर आकाश मुखर्जी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश मुखर्जी आणि ही मुलगी हे दोघे एकाच कंपनीत कामाला होते. साधारण वर्षभरापासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. आकाश मुखर्जी हा कल्याणमध्ये राहायला होता. तर मुलगी ही भिवंडीत राहायला होती. बुधवारी या दोघांनी बाहेर फिरायला जायचे ठरवले. ते दोघेही सकाळी ११.३० वाजता कल्याण रेल्वे स्थानकावर भेटले. यानंतर दोघेही ट्रेनने सीएसएमटीला गेले. तेथून हे दोघे गेटवे ऑफ इंडियाला फिरायला गेले. याठिकाणी काही वेळ घालवाल्यानंतर आकाश आणि ही मुलगी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा सीएसएमटी स्थानकात आले. येथून या दोघांनी वांद्रे येथे जाण्यासाठी ट्रेन पकडली. वांद्रे रेल्वेस्थानकावरुन हे दोघे रिक्षाने बँडस्टँडला पोहोचले.

सेक्स करायला नकार दिल्याने मिथ्थूने बँडस्टँडवर मुंबईतील MBBSच्या विद्यार्थिनीला ठार मारलं, पोलिसांचा दावा

बँडस्टँडवर मुलीसोबत नेमकं काय घडलं?

मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, संध्याकाळच्या सुमारास ते दोघे बँडस्टँडला पोहोचले. याठिकाणी असलेल्या खडकांच्या परिसरात दोघेही गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आकाशने मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तुझा धर्म स्वीकारल्याचे सांगितले. मी धर्मांतर केल्याची कागदपत्रे तुझ्या मावशीला दाखवू आणि त्यांच्याकडून लग्नासाठी आशीर्वाद घेऊ, असे आकाशने सांगितल्याचे मुलीने जबाबात म्हटले आहे. या सगळ्या गप्पा मारेपर्यंत रात्रीचे दहा वाजले. उशीर झाल्यामुळे मुलीने मला घरी जायचे असल्याचे आकाशला सांगितले. आपण दोघे घरी जायला निघू, असे तिने सांगितले. मात्र, त्यावेळी आकाशच्या वागण्यात अचानक बदल झाला. आपण आणखी थोडावेळ थांबू, असे तो मला सांगू लागला. आपण खासगी कार करून घरी जाऊ, असेही आकाशने तिला सांगितले. मात्र, उशीर झाल्यामुळे मुलीने आणखी थांबण्यास नकार दिला आणि ती रडू लागली. तिने घरी जाण्यासाठी धोशा लावला. तेव्हा आकाशने तिच्या तोंडावर हात दाबून धरला.

gangrape in mumbai मुंबई: वांद्रे बँडस्टँड येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार, बॉयफ्रेंडसह तिघांना अटक

यानंतर आकाशने या मुलीचे केस पकडून तिचे डोके खडकावर आपटले. त्यानंतर आकाशने तिचे डोके जवळच्या पाणी साठलेल्या खड्ड्यात बुडवले. मुलीने कसेबसे त्यामधून डोके वर काढले. त्यानंतर तिने आजुबाजूच्या लोकांना पाहून ओरडायला सुरुवात केली. त्यापैकी काहीजणांन आकाशला जाब विचारला. त्यावेळी आकाशने, ही मुलगी पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. यावेळी मुलीच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमांमधून रक्त येत होते. तिने पुन्हा एकदा आजुबाजूच्या लोकांना आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगत मदतीसाठी याचना केली. त्यावेळी काही लोकांनी पोलिसांना खबर देताच आकाश मुखर्जीने तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी जखमी अवस्थेतील मुलीला भाभा रुग्णालयात दाखल केले. तिच्या नाकातून आणि चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त वाहत होते. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी आकाश मुखर्जीला अटक केली असून त्याच्यावह हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here