Sakshi Murder Case: सिद्धू मुसेवाला, हुक्क्याचा चस्का ते हत्येपूर्वीचा नवा CCTV; या ५ मुद्द्यांनी साक्षी मर्डर केसला नवं वळण
साहिलने कुठून विकत घेतला होता चाकू…
हा इतका भयंकर खून करण्यासाठी साहिलने दिल्लीबाहेरून चाकू आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येसाठी त्याने हरिद्वार इथून चाकू आणल्याचा खुलासा आरोपीने केला आहे. अधिक माहितीनुसार, शाहबाद डेअरी परिसरात साक्षीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिलच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. गुरुवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला रोहिणी न्यायालयात हजर करण्यात आलं. साहिलची अधिक चौकशी आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि मोबाईल जप्त करण्यासाठी त्याच्या रिमांडची गरज आहे. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अर्ज स्वीकारला. न्यायालयात हजर करेपर्यंत चाकू जप्त करण्यात आला नव्हता.
चाकूने हल्ला केल्याने शरीर रक्तबंबाळ…
दुसरीकडे साक्षीवर साहिलने चाकूने इतका भीषण हल्ला केला की तिच्या शरीराचे अनेक भाग निकामी झाले होते. वाराच्या जखमांमधून पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, साक्षीचे बहुतेक अवयव निकामी झाले आहेत. अवयव निकामी झाल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यानेच तिचा मृत्यू झाला.