पुणे : वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊन असं वातावरण पाहायला मिळत आहे. अशात आता मान्सूननही पुढे सरकला असल्यामुळे आज बहुतांश जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा पहायला मिळेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या ३ दिवसांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.सकाळपासून ते दुपारी दोनपर्यंत तापमानात वाढ होऊन दुपारनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. तर मोसमी पाऊस दाखल होईपर्यंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारा नजीक असणाऱ्या मुंबई, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळेही उकाडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.

Monsoon Update: मान्सूनची आगेकूच, पुढच्या २ दिवसांत अरबी समुद्रात बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

महाराष्ट्रात कुठे पावसाचा तर कुठे उन्हाचा तडाखा?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, सोलापूरमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

१५ जूनपासून देशातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात

१९ मे पासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत व अरबी समुद्रातील दाखल झाला असून आता तो लवकरच केरळ आणि महाराष्ट्रात दाखल होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनपासून देशातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते. पण हवामानातील बदलांमुळे याला विलंब झाला. पण अखेर आता मान्सून पुढे सरकला आणि बुधवारीच तो बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे.

Monsoon Update: मान्सूनने धरला वेग, केरळनंतर या तारखेला महाराष्ट्रात बरसणार; हवामान खात्याकडून नवे अपडेट्स

महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा हा वेग पाहता केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहू शकतो. १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here